Maharashtra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मला माफ करा; राज ठाकरेंना पत्र लिहून अविनाश जाधव यांचा पदाचा राजीनामा

Avinash Jadhav News : मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भोपळा फोडता आला नाही. मागच्या निवडणुकीत मनसेने एक जागा राखली होती. मात्र, यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजू पाटील यांचाही पराभव झाला. राजू पाटील यांच्या पराभवाने कल्याण ग्रामीणची हक्काची जागाही मनसेने गमावली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मनसेला मोठं अपयश पदरी पडलं. या पराभवाची जबाबदारी घेऊन मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने अविनाश जाधव यांनी माफीही मागितली आहे.

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वाधिक जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले होते. मनसेने यंदा स्वबळावर निवडणुकीत उतरले होते. तर काही जागांवर भाजपचा पाठिंबा मिळवला होता. शिवडी विधानसभा मतदारंसघात महायुतीने उमेदवार उतरवला नव्हता. त्यामुळे शिवडीत महायुतीने मनसेच्या बाळा नांदगावकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना माघार घेण्यासाठी बोललं जात होतं. मात्र, सदा सरवणकर माघार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे माहीममध्ये तिंरगी लढत पाहायला मिळाली. मात्र, माहीममध्येही मनसेला पराभवाचा सामना करावा लागला.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात अविनाश जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ठाण्यातही तिरंगी लढत पाहायला मिळाली. ठाण्यात उद्धव ठाकरेंकडून राजन विचारे, भाजपकडून संजय केळकर आणि मनसेकडून अविनाश जाधव रिंगणात होते. ठाण्यातही मनसेला पराभवाचा सामना करावा लागला. ठाण्यात मनसे तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. ठाण्यात भाजपच्या संजय केळकर यांचा विजय झाला तर मनसेच्या अविनाश जाधव यांचा पराभव झाला. तर कल्याण ग्रामीणमध्येही राजू पाटील यांचा पराभव झाला.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेने जाहीर केलेल्या उमेदवारांचाही दारुण पराभव झाला. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

'विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघरमध्ये पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास मला माफ करावे, अशा आशायाचे पत्र लिहून अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT