Autorickshaw fare Hike Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या दरात पुन्हा भाडेवाढ; सर्वसामानांच्या खिशाला कात्री

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, रिक्षा टॅक्सीची दरवाढ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

मुंबई - पुण्यानंतर आता मुंबईतही (Mumbai) रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. मुंबईत रिक्षाची दोन रुपयांनी तर टॅक्सीची तीन रुपयांनी भाडेवाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीचे किमान भाडे अनुक्रमे 23 व 28 रुपये करण्यास मुंबई महानगर प्राधिकरणाकडून अखेर मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या शनिवारी म्हणजेच 1 ऑक्टोबर 2022 पासून रिक्षाचे (Auto Rickshaw) किमान भाडे 23 रुपये आणि टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपये होणार आहे. रिक्षा टॅक्सी संघटनानी दिलेल्या संपाच्या ईशाऱ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सीएनजी गॅसच्या दरात वाढ होत आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात सीएनजी गॅसच्या दरात कपात केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ केली. सध्या सीएनजी गॅसचा दर 80 रुपयांच्या घरात पोहचला आहे. राज्यातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजी गॅस आधारीत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसत होता.

मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा टॅक्सीचे सुधारित भाडे 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. ऑटोरिक्षासाठी प्रवाश्यांना पहिल्या 1.5 किमीसाठी 21 वरून 23 रुपये मोजावे लागणार आहे तर टॅक्सीसाठी पहिल्या 1.5 किमीसाठी 25 वरून 28 रुपये मोजावे लागणार. कूल कॅब एसीसाठी आता नागरिकांना किमान भाडे (पहिल्या 1.5 किमीसाठी) 40 रुपये होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशात आधी रिक्षाचे किमान भाडे 21 रुपये आणि प्रत्येक किमीकरिता 14.20 रुपये, टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये प्रत्येक किमीकरिता 16.93 रुपये तर कूल कॅब एसीचे किमान भाडे 33 रुपये प्रत्येक किमीकरिता 22.96 रुपये होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT