राज्यात लसीकरणासाठी राज्य सरकार राबवणार औरंगाबाद पॅटर्न?
राज्यात लसीकरणासाठी राज्य सरकार राबवणार औरंगाबाद पॅटर्न? Saam Tv
मुंबई/पुणे

राज्यात लसीकरणासाठी राज्य सरकार राबवणार औरंगाबाद पॅटर्न?

सुरज सावंत

सुरज सावंत

औरंगाबाद: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता आणि राज्यातील रुग्णसंख्या घटत चालली आहे. आकडेवारीनुसार, काल दिवसभरात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, आता संपूर्ण राज्यात लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न Aurangabad Pattern for Vaccination राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने State Government घेणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. लसीचा एकही डोस न घेतलेल्या लोकांना पेट्रोल, डिझेल, राशन आणि गॅस मिळणार नाही असाही निर्णय सरकारने घेतला आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे देखील पहा-

तर सर्व मंत्र्यांनीही राज्यात औरंगाबाद पॅटर्न राबवण्यात यावा असे बैठकीत म्हटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लसीकरण सुरु झाल्यापासून देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होत आहे तरी, जगभरातील काही देशात पुन्हा कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे, चीनचे उदाहरण यासाठी ताजे आहे. त्यामुळे संरक्षणासाठी पुर्वतयारी म्हणून हा पॅटर्न राबवण्यात यावा आणि यासाठी अंमलबजावणी करण्यात यावी असेही या बैठकीत सांगण्यात आले आहे.

काय आहे नेमका औरंगाबाद पॅटर्न?

औरंगाबादमध्ये  लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लसीचा पहिला डोस घेतला नसेल तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस मिळणार नाही नसल्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरणसाठी आता हा औरंगाबाद पॅटर्न राज्यभर राबवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर लोकसभेत महिला, दिव्यांग आणि युवा अधिकारी कर्मचारी सांभाळणार ३७ मतदान केंद्र

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या आणखी एका उमेदवाराने भरला अर्ज; दरेकरांचं काय?

Today's Marathi News Live : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

Nashik-Mumbai Highway : नाशिक मुंबई महामार्गावर दुचाकीला धडक दिल्यानंतर बलगरने घेतला पेट; केबीनमध्ये अडकून चालकाचा होरपळून मृत्यू

Camphor Benefits: देवाला प्रसन्न करण्यासह आरोग्यासाठी कापूर आहे फायदेशीर

SCROLL FOR NEXT