विरार हादरलं! आयसीआयसीआय बँक लुटीचा प्रयत्न Saam Tv
मुंबई/पुणे

विरार हादरलं! आयसीआयसीआय बँक लुटीचा प्रयत्न

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

विरार -विरारमध्ये Virar बँकेवर Bank दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  काल रात्री ८ वाजेच्या सुमारास काही जणांनी बँक लुटण्याचा Robbery प्रयत्न  केला त्यांच्या जवळ सशस्त्र देखील होते. बँकेत झालेल्या या चाकू हल्ल्यात शाखा व्यवस्थापक महिला अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य कॅशियर महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  

बँकेच्या माजी व्यवस्थपकानेच बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अनिल दुबे याने केलेल्या हल्ल्यात बँकेच्या व्यवस्थापक महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अन्य महिला ही जखमी झाली आहे. नागरिकांनी हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या या आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हे देखील पहा -

आयसीआयसीआय बँकची विरार पूर्वेच्या स्टेशन परिसरात एक शाखा आहे. काल संध्याकाळी बँक बंद झाल्यावर सर्व कर्मचारी हे आप-आपल्या  घरी निघून गेले होते. त्यावेळी बँकेत  व्यवस्थापंक योगिता वर्तक चौधरी आणि रोखपाल श्वेता देवरुख या दोघीच असल्याचे सांगण्यात येत आहे.

रात्री ८ वाजेच्या सुमारास बँकेचा माजी व्यवस्थापकअनिल दुबे बँकेत आला. अनिल दुबे याने चाकूचा धाक दाखवत बँकेतील रोख रक्कम आणि इतर दागिने लुटण्याचा प्रयत्न केला असता  या वेळी दोघींनी त्याला विरोध केला. दोघी दुबे याला विरोध करत असल्यामुळे दुबे याने दोघींवर चाकूने हल्ला केला. योगीता वर्तक चौधरी या व्यवस्थापक महिलेचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तर रोखपाल श्वेता गंभीर जखमी झाली आहे. हल्ला करून पळणाऱ्या आरोपी दुबे याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT