Attempt to attack Ajay Maharaj Baraskar, who made allegations against manoj jarange patil  Saam Tv
मुंबई/पुणे

Ajay Maharaj Baraskar: मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्न

Attempt to attack Ajay Maharaj Baraskar: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> आवेश तांदळे

Attempt to attack Ajay Maharaj Baraskar:

एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर येत आहे. जरांगे यांच्याविरोधात बारसकर यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यांनी जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. यातच आज त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज चर्चगेट परिसरामध्ये बारसकर हे प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, अशी माहिती त्यांनी स्वतः दिली. यातच जवळच असलेल्या मरीन ड्राईव्ह पोलिसांनी हल्लेखोरांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांनी बरासकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय महाराज बारस्करांवर पाच ते सहा लोकांनी हल्ला केला होता. त्यांची पत्रकार परिषद होणार होती, मात्र हल्ला होणार असल्याची माहिती आधीच मिळाल्याने ती रद्द करण्यात आली आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. याप्रकरणी तक्रार आल्यास गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांच्यावर काय केले होते आरोप?

याआधी बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करत म्हटलं होतं की,'' मनोज जरांगे यांनी दररोज आपली वक्तव्ये बदलली. ते नेहमी खोटं बोलतात. जरांगे कॅमऱ्यासमोर बोलतात ते पारदर्शक आहेत, असं समजून जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मात्र त्यांनी २३ डिसेंबर रोजी पहिल्यांदा कन्हया हॉटेलमध्ये पहिली गुप्त भेट घेतली.''

ते म्हणाले होते की, ''25 तारखेला सगळ्यांच्या साक्षीने मुंबईला निघायचं होतं. त्यावेळी अचानक २० जानेवारीला मुंबईला निघायचं अशी घोषणा जरांगे पाटलांनी सभेवेळी केली. त्यांनी आम्हाला कोणतीही माहिती न देता ही घोषणा केली होती. जरांगेंची रांजणगाव गणपती येथे एका बंगल्यावर पहाटे 4 ते सकाळी 6 या वेळेत एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी बैठक झाली होती. लोणावळा आणि वाशीमध्ये सुद्धा जरांगे पाटलांनी गुप्त बैठक घेतल्यात. त्यामुळे जरांगे पाटील पारदर्शक व्यक्ती नाहीत हे समाजाने लक्षात ठेवावे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT