Mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: ATS ची मोठी कारवाई; डोंगरीतील बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज केले उद्ध्वस्त, एकाला अटक

Vishal Gangurde

सचिन गाड

Mumbai Crime News: मुंबईत दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी विरोधी पथकाच्या नागपाडा युनिटने बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त केले आहे. डोंगरी येथून हे टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणी ३२ वर्षीय रिवास मोहम्मद पि के नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) नागपाडा युनिटने डोंगरीतील टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त केले आहे. एटीएसने एकूण १४९ सिम कार्ड असलेले चार सिम बॉक्स केले जप्त केले आहे. या प्रकरणी एटीएसने ३२ वर्षीय रिवास मोहम्मद पि के नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

बांगलादेश येथील अलामल नावाच्या व्यक्तीच्या मदतीने अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालवत होता. परदेशातून येणारे कॉल सिम बॉक्सच्या मदतीने इच्छुक स्थानिक मोबाईलवर रूट करून टेलिकॉम खात्याची आर्थिक फसवणूक सुरू होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने डोंगरी येथे अनधिकृतरित्या टेलिफोन एक्स्चेंज चालवणाऱ्या ३२ वर्षीय रिवास मोहम्मद पीके याला अटक केली आहे. हा मूळचा केरळचा आहे. एटीएसने घराची झडती घेतल्यावर घराच्या पोटमाळ्यावर एक खाचा करून त्यात चार सिम बॉक्स सिमाकार्ड भरलेल्या स्थितीत सापडले. या सिमबॉक्समध्ये १४९ सिमकार्ड सापडले. कारवाईदरम्यान, ५ लाख ७१ हजार १०० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

रिवास मोहम्मद पीके याने बांग्लादेशातील अलामलच्या मदतीने पैसे कमविण्याचा उद्देशाने चायना सिमबॉक्स वापर करून बेकायदेशीर कॉल सेंटर सुरु केले होते. रिवासने भारत सरकारच्या टेलिकॉम खात्याची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT