Mumbai Trans Harbour Link Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Trans Harbour Link: सागरी सेतूमुळे मुंबई-नवी मुंबई प्रवास होणार सुसाट; वेगमर्यादा किती? कोणत्या वाहनांना असेल परवानगी?

Atal setu mumbai : महाराष्ट्रातील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तब्बल २२ किलोमीटर लांबीचा हा सागरी सेतूचे लोकार्पण शुक्रवारी १२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

कोमल दामुद्रे

Sewri Nhava Sheva :

महाराष्ट्रातील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तब्बल २२ किलोमीटर लांबीचा हा सागरी सेतूचे लोकार्पण शुक्रवारी १२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

मुंबई (Mumbai) पोलिसांनी या सागरी सेतूवर वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित केली आहे. प्रति तास वेग मर्यादा चारचाकींसाठी १०० किलोमीटर ठेवण्यात आली आहे. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे तासांचा प्रवास (Travel) काही मिनिटांत होणार आहे. मात्र या लांबलचक सागरी सेतूवर काहीच वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

हा देशातील सगळ्या मोठा सागरी सेतू असून जगात १२ व्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी कार, टॅक्सी, हलकी वाहने, मिनिबस, बस या सर्व वाहनांना परवानगी असणार आहे.

सागरी सेतूच्या या चढ आणि उताराची वेगमर्यादा ४० किलोमीटर प्रति तास एवढी ठरवण्यात आली आहे. ही वेगमर्यादा अपघात (Accident) आणि वाहतूकीतील अडथळे टाळण्यासाठी वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना पूर्व दृदगती मार्गावर प्रवेश बंदी असेल. पण सागरी सेतूवर परवानगी देण्यात आली आहे. यासाठी वाहनचालकांना मुंबई पोर्ट-शिवडी एक्झिट मार्ग तसेच एमबीपीटी मार्गाचा वापर करुन उड्डाणपूलावर चढावे लागणार आहे.

1. कोणत्या वाहनांना असेल बंदी

मोटरसायकल, मोटरसायकल, मोपेड आणि तिनचाकी वाहने, ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर, जनावर वाहून नेणारी वाहने तसेच कमी गतीने चालणाऱ्या वाहनांवर सागरी सेतूवर पूर्णता बंदी घालण्यात आली आहे.

2. अटल सेतूबद्दल काही गोष्टी

  • सागरी सेतू बांधताना ५०० बोइंग विमाने व १७ आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर.

  • सेतूची लांबी २२ किमी, त्यातील १६.५० किमी भाग समुद्रात तर ५.५० किमी भाग जमिनीवर.

  • सागरी सेतूसाठी १८ हजार कोटींचा खर्च

  • मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन बंदरांना जोडले

  • मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर सुमारे १५ किमीने कमी झाले.

  • बांधकामासाठी सात वर्षांचा कालावधी लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT