Mumbai: शैक्षणिक वर्ष संपताना पालिका विद्यार्थ्यांसाठी खरेदी करणार टॅब
Mumbai: शैक्षणिक वर्ष संपताना पालिका विद्यार्थ्यांसाठी खरेदी करणार टॅब Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai: शैक्षणिक वर्ष संपताना पालिका विद्यार्थ्यांसाठी खरेदी करणार टॅब

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई महापालिका ३९ कोटी रुपये खर्चून म्हणजेच प्रत्येकी २०,५३२ रुपयांचे ऐकूण १९,४०१ इतके टॅब खरेदी करणार आहे. ४ महिन्यांच्या निविदा प्रक्रियेनंतर आता स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी हा प्रस्ताव येणार असून कार्यादेश मिळाल्यास दोन ते अडीच महिन्यात विद्यार्थ्यांच्या हातात टॅब (tablet computer) येणार आहेत. २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (At the end of the academic year, Mumbai Municipal Corporation will purchase tab computers for students)

हे देखील पहा -

महापालिकेच्या (BMC) कंत्राटातील अटीनुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांचे टॅब ६० दिवसात आणि हिंदू,उर्दु माध्यमाचे टॅब ७५ दिवसात पुरवायचे आहेत. हे टॅब आता देतानाच पुरवठादाराला संबंधित विद्यार्थ्याला आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणं अनिवार्य असणार आहे. पण हे टॅब विद्यार्थ्यांच्या हातात येताना १० वीच्या विद्यार्थ्यांची कदाचित परीक्षा देखील होऊन जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास (Online Study) करणं सोईचं व्हावं यासाठी हे टॅब खरेदी केले जाणार होते. एड्युसपार्क इंटरनॅशनल प्रा. लि. ही कंपनी हे टॅब पुरविणार आहे. एक वर्षाच्या हमी बरोबरच पालिकेने चार वर्षांची जादा हमी या टॅबची घेतली आहे. याआधी २०१५ मध्ये पालिकेने २० हजार टॅब खरेदी केले होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाचा पुन्हा तपास होणार

IRCTC Hotel Service : स्टेशनवर 100 रुपयांत मिळणार हॉटेलसारखी रूम; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Amaravati Express Fire : दादर रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेसला आग, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

CBSE Results 2024: प्रतीक्षा संपली! सीबीएसई १० आणि १२ वीचा निकाल कधी लागणार? महत्वाची अपडेट आली समोर

Loksabha Election: प्रसिद्ध गायक नंदेश उमप लोकसभेच्या रिंगणात; ईशान्य मुंबईमधून भरला अर्ज

SCROLL FOR NEXT