IRCTC Hotel Service : स्टेशनवर 100 रुपयांत मिळणार हॉटेलसारखी रूम; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

IRCTC Hotel Service Room : अशावेळी कामाच्या ठिकाणी पोहचण्यास कधी कधी फार उशीर होतो. निघालेल्या नागरिकांना रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे प्रशासनाकडून राहण्याची सुविधा पुरवली जाते.
IRCTC Hotel Service
IRCTC Hotel ServiceSaam TV

कामानिमित्त अनेक व्यक्ती दररोज प्रवास करतात. काहींना लांबच्या राज्यांमध्ये देखील प्रवास करावा लागतो. अशावेळी कामाच्या ठिकाणी पोहचण्यास कधी कधी फार उशीर होतो. उशीर झाल्यावर त्या रात्री बाहेर हॉटेलमध्ये रूम घेऊन रहावे लागते. यामध्ये बरेच पैसे खर्च होतात. शिवाय अनेकवेळा रूम देखील पटकन उपलब्ध होत नाही. यामध्ये आपली बरीच चिडचिड होते.

रेल्वेमार्फत नागरिकांना बऱ्याच सोयीसुविधा दिल्या जातात. ट्रेनची संख्या प्रवाशांसाठी वाढवली जाते. सणासुदीच्या काळात तसेच उन्हाळी आणि दिवाळीची सुट्टी आल्यावर अनेक व्यक्ती गावी जातात. लांबच्या प्रवासात नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाते. त्यासाठी ट्रेनच्या फेऱ्या आणि जास्तीच्या ट्रेनची संख्या वाढवली जाते.

नागरिकांना जेवणाची सुविधा दिली जाते. तसेच राहण्यासाठी देखील सुविधा दिली जाते. ज्यांना सतत एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करत काम करावे लागते अशा नागरिकांना तसेच अन्य कामासाठी किंवा फिरण्यासाठी बाहेर निघालेल्या नागरिकांना रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे प्रशासनाकडून राहण्याची सुविधा रखील पुरवली जाते.

रेल्वेकडून देण्यात येणारे रूम देखील छान असतात. यामध्ये रात्रीच्यावेळी आपल्याला गरजेच्या सर्व सुविधा असतात. एक रात्र आपण आरामात येथे काढू शकतो. अगदी बाहेर हॉटेलमध्ये जशा रूम आणि सुविधा असतात त्याच सुविधा येथे देखील मिळतात. या रुमसाठी तुम्हाला फक्त 100 ते 700 रुपये मोजावे लागतात.

अशी बुक करा तुमची रूम

सर्वात आधी आयाआरसीटीसी ॲप फोनमध्ये डाऊनलोड करा.

त्यावर तुमचे लॉगिन करून घ्या.

पुढे माय बुकिंगचे ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.

तिकीट बुकिंगच्या जवळ तुम्हाला रीटायरींग रूम हा पर्याय दिसेल.

पुढे तून्हला विचारलेली माहिती भरल्यावर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला रूप उपलब्ध होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com