Kalyan Politics mint
मुंबई/पुणे

Kalyan Politics: कल्याण पूर्व जागेवरून रणकंदन; मतदारसंघावर काँग्रेसचा दावा, महायुतीनंतर मविआत रस्सीखेच

Assembly Election: कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघावरून महायुती आणि मविआमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झालीय. मविआत आता काँग्रेसने या जागेवर दावा ठोकलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ सध्या राजकीय चर्चेत असून, महायुती शिवसेना शिंदे गट भाजपने दोघांनी या मतदारसंघावर दावा केलाय तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट ,कोंग्रेस ने देखील या मतदारसंघावर दावा केलाय .त्यामुळे एकूणच महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये देखील या जागेवर तणाव निर्माण झाला आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड सध्या कारागृहात आहेत .या मतदारसंघात गणपत गायकवाड तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेत यंदा त्यांच्या  पत्नी सुलभा गायकवाड यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

महायुतीत तणावाची स्थिती

शिवसेना शिंदे गटानेही कल्याण पूर्व मतदारसंघावर दावा केला आहे. शिंदे गटाकडून महेश गायकवाड, निलेश शिंदे आणि विशाल पावशे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीतील तणाव अधिकच वाढला आहे आणि जागेवर जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

महाविकास आघाडीची तयारी

महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने या मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाकडून धनंजय बोराडे, रमेश जाधव आणि हर्षवर्धन पालांडे हे इच्छुक उमेदवार आहेत. धनंजय बोराडे यांनी 2019।ची विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती .तत्कालीन शिवसेनाच्या बहुतेक नगरसेवकांनी बोराडे याना पाठिंबा दिला मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर या नगरसेवकानी शिंदे यांच्या सोबत जाणे पसंत केले .त्यामुळे यंदाच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचचे ठाकरे गटासमोर आव्हान निर्माण झाले आहे.

काँग्रेसचा दावा

दरम्यान, काँग्रेस पक्षाने देखील कल्याण पूर्व मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेचे उमेदवार आजपर्यंत झालेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात पराभूत झाले आहेत, त्यामुळे यंदा ही जागा काँग्रेसला द्यावी, अशी मागणी स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष सचिन पोटे हे इच्छुक आहेत.

बैठकीत महत्त्वाचे निर्णय

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्व मतदारसंघावर दावा कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. यासंदर्भात नुकतीच कल्याण मध्ये  काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कोकण विभागातून काँग्रेसचा प्रभाव कमी झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला सन्मानजनक जागा वाटप करण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः कल्याण डोंबिवलीतील चार विधानसभा पैकी कल्याण पूर्व विधानसभा काँग्रेसला द्यावी, असे ठाम मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

एकूणच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ महायुतीमधील पक्षांसह आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये तणावाचे केंद्रबिंदू ठरत आहे.  येत्या काळात हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT