Maharashtra Politics: अहंकारी काँग्रेसचा पराभव, हरियाणाच्या निकालावरून एकनाथ शिंदे आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली

CM Eknath Shinde Criticized Congress And Nana Patole:
Maharashtra Politics: अहंकारी काँग्रेसचा पराभव, हरियाणाच्या निकालावरून एकनाथ शिंदे आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली
CM Eknath Shinde Criticized Congress And Nana Patolesaam tv
Published On

हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसचा पराभव झाला. भाजपने ९० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसचे फक्त ३७ उमेदवार विजयी झाले. काँग्रेसच्या पराभवावरून आता भाजप आणि इतर पक्षांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. हरियाणाच्या निकालावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये जुंपली आहे. 'अहंकारी काँग्रेसचा पराभव झाला', असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर टीका केली.

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. अहंकारी रावणाप्रमाणे अहंकारी काँग्रेसचा पराभव झाला, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. हरियाणाच्या निकालावरून मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या टिकेला उत्तर देत अहंकार येत्या निवडणुकीत दिसून येईल असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले.

Maharashtra Politics: अहंकारी काँग्रेसचा पराभव, हरियाणाच्या निकालावरून एकनाथ शिंदे आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली
Maharashtra Politics: अजित पवारांचा मतदारसंघ ठरला! प्रफुल पटेलांनी केली उमेदवारीची घोषणा; महायुतीचे २३५ उमेदवारही 'या' दिवशी ठरणार

हरियाणाचा निकाल लागला असून त्यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. भाजप सध्या जल्लोष करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर टीका करताना सांगितले की, 'आज त्यांची लोकं म्हणत आहेत की काँग्रेसला अहंकार नडला. अहंकारी रावणाचा जसा पराभव झाला तसं अहंकारी काँग्रेसचा पराभव झाला. एकीकडे अडीच वर्षांतील त्यांचे काम महाविकास आघाडीने सांगावे. महायुती त्यांना दोन वर्षांत केलेले काम सांगेल. केलेल्या कामाचा लेखाझोका आम्ही जनतेच्या दरबारात मांडू. हरियाणात विकासनिती जिंकली. हरियाणामध्ये विकासनिती आणि महाराष्ट्रामध्ये महायुती. महाराष्ट्रातही विकासनितीच्या जोरावर महायुती जिंकणार आहे.' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर नाना पटोले यांनी देखील मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, 'महाराष्ट्रात निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणाचा अहंकार आणि कोणाचा भ्रष्टाचार आणि कमिशनखोरी ही पुढे येणार आहे. ज्याप्रमाणे लोकसभेत यांचा पराभव झाला त्याचं चिंतन केले नसेल तर ठिक आहे. सत्तेमध्ये बसलेली लोकं अहंकारामध्ये आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे.'

Maharashtra Politics: अहंकारी काँग्रेसचा पराभव, हरियाणाच्या निकालावरून एकनाथ शिंदे आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली
Maharashtra politics : मोठी बातमी! पुण्यातून शिंदेंच्या शिवसेनेची माघार, एकही उमेदवार देणार नाहीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com