मुंबई/पुणे

Assembly Election: वडगावशेरीवर तिन्ही पक्षांचा दावा; राष्ट्रवादीच्या वादात आता शिवसेनेची उडी

Bharat Jadhav

सागर आव्हाड, ,साम प्रतिनिधी

पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. आधी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारी कोणाला यावरून वाद सुरू होते. त्यातच हा मतदारसंघ भाजपला सुटत नाही, असे दिसल्यावर भाजपचे बडे नेते बापूसाहेब पठारे यांनी तुतारी हाती घेतली. आता भाजप आणि राष्ट्रवादी सुरू असलेल्या वादात शिवसेनेने देखील उडी घेतलीय.

शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय. त्यामुळे आधीच भाजप राष्ट्रवादीत वाद सुरू असल्याने आता शिवसेने सुद्धा दावा केल्यामुळे महायुतीत नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसात महाविकास आघाडीतील काही माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी हे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. विशेषत यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील काही नगरसेवक आणि पदाधिकारी आमच्या संपर्कात असल्याची माहिती नाना भानगिरे यांनी दिली. तर वडगावशेरी हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे.

शिवसेना पक्षाला मानणारा वर्ग येथे मोठ्या प्रमाणात आहे. वडगाव शेरी या ठिकाणी सेनेचे काही नगरसेवक आहेत आणि हा मतदारसंघ आमचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आम्ही या जागेचा दावा सोडणार नाहीत. असंदेखील नाना भानगिरे म्हणालेत.

या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत. तर भाजपचे माजी आमदाराने देखील या मतदारसंघासाठी दंड थोपटले आहेत. जगदीश मुळीक हे देखील आग्रही आहेत. कालच त्यांनी मतदारांना आवाहन करणारे एक पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी २०१९ ला थोडक्यात पराभव झाला मात्र दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो, आमदार असताना काम केले. शहराध्यक्ष असताना तत्कालीन सरकारला धारेवर धरले.

आता विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. दाव्यांमुळे महायुतीत नवा वाद उफळाला आहे. आता शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे पुण्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Low Budget Kedarnath Trip : कमी पैशांत 'केदारनाथ यात्रा' कशी कराल? फॉलो करा हा प्लान

Nitin Gadkari : सत्ता कोणीचीही असो, रामदास आठवलेंना मंत्रिपदाची गॅरंटी; नितीन गडकरींच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला, VIDEO

Maharashtra News Live Updates : खासदार श्रीकांत शिंदेंनी वरळीत घेतला लाडकी बहिण योजनेचा आढावा

Corona New Variant : युरोपमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा धुमाकूळ, भारताला किती धोका?

भारतीय अ संघाने जिंकली Duleep Trophy 2024! भारतीय क संघावर मिळवला 132 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT