Maharashtra News Live Updates : पुण्यात २६ सप्टेंबरपासून सिव्हील कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरु होणार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 22 September: आज रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील उपोषण, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

पुण्यात २६ सप्टेंबरपासून सिव्हील कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरु होणार

पुण्यात २६ सप्टेंबरपासून सिव्हील कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरु होणार

अंडरग्राउंड मेट्रोचे काम पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोककर्पण सोहळा

यावेळी स्वारगेट कात्रज भुयारी मार्गाचे भूमिपूजन होणार

कसबा पेठ,मंडई,स्वारगेट तीन मेट्रो स्थानके प्रवाशांसाठी खुली होणार

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील एस पी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा ही होणार आहे.

Ahmedngar News : नगर-दौंड मार्गावर रस्ता रोको आंदोलन; वाहनांच्या लांबच लांब रांगा

साकळाई उपसा जलसिंचन योजना जनआंदोलन समितीच्या वतीने नगर-दौंड मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी वाहनचालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. सध्या पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्यात येत आहे.

Kolhapur News : कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्याला करवीर पोलिसांनी केली अटक

कायदेशीरित्या गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून फिरणाऱ्या एकाला बाचणी येथून करवीर पोलिसांनी अटक केलीय. ऋत्विक उर्फ सनी रामचंद्र जाधव असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत राऊंड जप्त केलंय. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या पथकाने बाचणी येथे ही कारवाई केली आहे.

Jalna News : मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक

मनोज जरांगे पाटील १७ सप्टेंबरपासून उपोषणाला सुरु आहे जरांगे यांची प्रकृती खालवत चालल्याने राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून आज मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण सोडावं अशी समाजाची मागणी आहे.या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाकडून जालना बंदची हाक देण्यात आली आहे.जालना शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सावरकर चौक आणि भाजी मार्केट मध्ये सध्या कडकडीत बंद असल्याचं पाहायला मिळात आहे.

Amravati News : अमरावती शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; अनेकांना चावा, नागरिक भयभीत

अमरावती शहरात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढल्याने नागरिक व लहान बालकांमध्ये चिंता वाढली आहे, शहरात गल्लोगल्लीत भटकी कुत्रे फिरतांना दिसत आहे, एप्रिल ते जुलै या महिन्यात 6 हजार 348 मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे, तर धक्कादायक म्हणजे दररोज 70 लोकांना भटकी कुत्रे चावा घेत आहे शहरात गल्लीत जिकडे तिकडं भटकी कुत्रे फिरतांना दिसत आहे. त्यामुळे घराबाहेर पडतांना भिती वाटत आहे. त्यामुळे अमरावती महानगरपालिकाने तात्काळ यावर उपाय योजना कराव्या ही मागणी केली जात आहे.

Parbhani News : सकल मराठा समाजाकडून परभणी जिल्हा बंदची हाक

मराठा समाजालाओबीसी संवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत सकल मराठा समाजाच्यादोन गटाकडून परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना निवेदन देण्यात आले. या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले असून सर्व व्यापारी बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा सहावा दिवस, मराठा समाज आक्रमक

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून दिवसेंदिवस त्यांची तब्बेत खालावत चालली आहे, त्यांच उपोषण तात्काळ संपाव या दृष्टीने सरकारने पावलं उचलावीत या मागणीसाठी पुण्यावरून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत, आज त्यांच शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट अपेक्षित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com