Shreya Maskar
उत्तराखंडमधील प्रसिद्ध चार धामांपैकी एक म्हणजे केदारनाथ धाम होय.
केदारनाथ हे भगवान शंकराचे मंदिर आहे.
केदारनाथ मंदिर केदारनाथ गावातील मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेले आहे.
केदारनाथ १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.
कमी खर्चात तुम्हाला जर केदारनाथला पोहचायचे असेल तर डेहराडूनपर्यंत रेल्वेने प्रवास करा.
डेहराडूनवरून बसने तुम्ही कमी पैशांत केदारनाथला जाऊ शकता.
केदारनाथ यात्रा तीन ते चार दिवसात पूर्ण होते.
केदारनाथला गौरीकुंड पायथ्यापासून रस्त्याने जाता येते.
तुमच्यासोबत जर कोणी वयस्कर व्यक्ती असेल तर, डेहराडून ते केदारनाथ तुम्ही हेलिकॉप्टरने सुद्धा जाऊ शकता.
हेलिकॉप्टरची वेळीच बुकिंग केल्यास पैसे देखील कमी लागतात.