Shreya Maskar
मुंबई या मायानगरीला ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा आहे.
मुंबईतील सायन किल्ल्याला ऐतिहासिक पाश्वभूमी आहे.
इंग्रजांकडून सायनच्या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती.
मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनपासून अवघ्या दहा मिनिटांत सायनच्या किल्लावर पोहचता येते.
या किल्याच्या पायथ्याशी नेहरू उद्यान आहे.
सायन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी दगडी पायवाट तर मध्यभागी एक धबधबा आहे.
सायन किल्ल्याचा आकार मोठा असून किल्ल्याची तटबंदी आजही भक्कम आहे.
सायन किल्ल्यावरून गजबजलेल्या मुंबईचा सुरेख नजारा पाहायला मिळतो.