आश्रमशाळेतील शिक्षकाने मागितली आत्महत्येची परवानगी; वर्षभराचा रखडलाय पगार Saam Tv
मुंबई/पुणे

आश्रमशाळेतील शिक्षकाने मागितली आत्महत्येची परवानगी; वर्षभराचा रखडलाय पगार

अजय दुधाने

उल्हासनगर: अंबरनाथ तालुक्यातील (Ambarnath) काराव इथल्या आदिवासी आश्रमशाळेतील एका शिक्षकाचा पगार गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. त्यामुळं या शिक्षकांसह त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून या शिक्षकानं आता शेवटचा पर्याय म्हणून कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

पंकज बेद्रे असं या आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकाचं नाव आहे. बेद्रे हे गेल्या तीन वर्षांपासून अंबरनाथ तालुक्यातील काराव आदिवासी आश्रमशाळेत कायमस्वरूपी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र कोरोना काळात ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यानं विज्ञान शाखेचे दोन्ही वर्ग आश्रमशाळेने बंद केले. त्यामुळे आश्रमशाळेला सरकारी अनुदान असलं, तरी बेद्रे यांचं वेतन मात्र शासनानं थांबवलं. या गोष्टीला आता वर्ष उलटून गेलं, तरी शासनाच्या सेवेत कायमस्वरूपी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या बेद्रे यांना पगारच मिळालेला नाही. त्यामुळं बेद्रे यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे.

बेद्रे हे बदलापुरात पत्नी आणि दोन लहान मुलांसह भाड्याच्या घरात वास्तव्याला आहेत. मात्र पगारच नसल्यानं घरभाडे, मुलांची शाळेची फी, घरखर्च यासाठी त्यांच्यावर उसनवारी करण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांच्यावर मोठं कर्ज झालं असून त्यांनी अक्षरशः बायकोचं मंगळसूत्रही गहाण ठेवलं आहे. त्यामुळं आता यापुढे घर चालवणंही कठीण असल्याची उद्विग्न भावना बेद्रे व्यक्त करतआहेत. आपण शासनाच्या सेवेतील कायमस्वरूपी शिक्षक असून एखादा वर्ग अतिरिक्त झाल्यास त्या शिक्षकांचं वेतन बंद न करता येत नाही. त्यांचं समायोजन होईपर्यंत वेतन सुरू ठेवावं, असा शासनाचा आदेश आहे.

मात्र तरीही माझं वेतन बंद करण्यात आलं असं बेद्रे यांचं म्हणणं आहे. आपली दुसऱ्या एखाद्या शाळेत नेमणूक करावी, आणि आपलं वेतन सुरू करावं, यासाठी आदिवासी विभागाशी पत्रव्यवहार करूनही आपल्याला न्याय मिळाला नाही, त्यामुळे आता मला घर चालवणं कठीण झालं असून आता परिवारासह आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, असं पत्र बेद्रे शासनाला लिहिलंय. त्यामुळं शासनदरबारी त्यांची दखल घेतली जाते का? हे आता पाहावं लागणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT