Sharad Pawar/ Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

'देशहितासाठी मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या दबावापुढे झुकू नये; भाजप त्यांना समर्थन देईल'

देव, देश आणि धर्मासाठी तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या; आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, अन्य दोन पक्ष वाया गेले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली असून यासाठी आज भाजपने (BJP) संपूर्ण राज्यभरात मलिकांच्या राजीनाम्यासाठी पत्रकार परिषदाचा धडाका लावला आहे. यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईत घेतली यावेळी त्यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप करत ईडीने मलिकांवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं.

ते म्हणाले, गेले काही दिवस राज्यातील मंत्री ज्यांची कोठडीत रवानगी केली आहे. त्या नवाब मलिक यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना घ्यावा, त्यांना बडतर्फ करावे. देशहितासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ताठ मानेने उभे रहावे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दबावापुढे झुकू नये. ठाकरेंनी आता "झुकेंगे नही" आता करून दाखवा मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश द्यावे की नवाब मलिक यांच्यासारख्या सर्वांवर गुन्हे दाखल करा असं शेलार म्हणाले.

अन्य दोन पक्ष वाया गेलेले -

तसंच अजून किती नेत्यांचे दाऊद, त्याची बहिणीशी आर्थिक व्यवहार आहेत, याची चौकशी करावी. केंद्रीय यंत्रणाना या आतंकवादी कारवाईसाठी समर्थन द्यावे. देव, देश आणि धर्मासाठी तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या! आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. अन्य दोन पक्ष वाया गेले आहेत. उद्धव ठाकरे हे भूमिका घेतील तर भाजप 100 टक्के समर्थन देईल.

काही लोक बातम्या दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सत्य सर्वांसमोर आले आहे. पहिला FIR ठाणे कसाब वडवली पोलिस स्टेशनला 18 सप्टेंबर 2017 झाला. इकबाल कासकर यांच्यावर आणि दाउदच्या बहिणीवर एफआयर झाला. त्यामुळे ही राजकीय अटक असा शिमगा केला तरी चालणार नाही.

दरम्यान 2019 मध्ये इक्बाल मिर्चीवर FIR झाला. 3 फेब्रुवारी 2022 ला एनआयएने एअफआयआर दाऊद, छोटा चिकना, टायगर मेनन यांच्यावर तिसरा एफआयआर दाखल केला. उखाड दिया यांना एवढी तरी बुद्धी असेल तर समाजावे की भाजप 2017 पासून या दहशतवाद्यांना उखाडत आहे. बोरू बहाद्दरांना आता ट्रेनिंग देण्याची गरज आहे असा टोलाही त्यांनी यावेळी राऊतांना लगावला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यात कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी? जाणून घ्या एका क्लिकवर

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT