Ashish Shelar
Ashish Shelar Saam Tv
मुंबई/पुणे

उंदरांनाही सोडत नाहीत हे कसले वाघ; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस यांची सभा सुरु आहे. (Devendra Fadnvis Live) या सभेच्या सुरुवातीला भाजप नेते आशिष शेलारांनी भाषण केले. आशिष शेलार बोलताना शिवसेनवर टीका केली. काल शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली या टीकेली प्रत्युत्तर देताना शेलार म्हणाले, शिवसेना उंदरांनाही सोडत नाही. हे कसले वाघ आहेत, अशी टीका शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर केली.

आशिष शेलार म्हणाले, हनुमान चालिसा आपल्या घरात म्हणाच दुसऱ्याच्या घरातही जाऊन म्हणा. हनुमान चालीसा म्हटल्यानंतर लोकांना तुरुंगात टाकलं जात आहे. मेट्रोच्या कामाला, समृद्धी महामार्गाला, आरे कारशेडला, कोस्टल रोडला शिवसेनेचा विरोध असतो आणि म्हणतात आम्ही लोकांच्या हाताला काम दिलंय.

३ लाख कोटीची मुंबईच्या स्थायी समितीतून कंत्राटं मजूर झाली, याचा आम्हाला हिशोब द्या. जे हा हिशोब देऊ शकत नाहीत ते जनतेत भ्रम निर्माण करत आहेत. नाल्यात, गटारात, कचऱ्यात, सिवेजमध्ये, पेंग्विनमध्ये आणि आत्ता उंदरांमध्येही शिवसेनेनं पैसे खाल्ले. दहा हजार उंदीर मारायला १ कोटी रुपये खर्च केले, असंही शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

काश्मीरमध्ये हत्या झालेल्या राहुल भट्टशी तुमचा संबंध काय? मुंबईतील डॉ. अमरापूरकर यांचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावं. आरे कारशेड का झालं नाही? त्याचं उत्तर द्या. काश्मिरचा प्रश्न सोडा ते बघायला तिथं नरेंद्र मोदी सक्षम आहेत, असंही शेलार म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी आत्महत्या प्रकरण, हायकोर्टात याचिका

Oily Skin Tips : ऑयली स्किनपासून २ मिनिटांत सुटका; अप्लाय करा 'हे' खास लोशन

Ajit Pawar: दहा वर्षात पंतप्रधान मोदींवर एकही आरोप झाला नाही: अजित पवार

Mobile Hack: फोन पाण्यात पडला तर, चुकूनही करु नका हे काम,नाहीतर होईल नुकसान

Shrikant Shinde Property: अय्यो! फक्त ३ लाख कॅश, ५ वर्षात १० कोटींची वाढ.. CM शिंदेंच्या लेकाची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT