Ashadi Ekadashi 2022 MSRTC 4700 Special ST Buses Pandharpur Yatra
Ashadi Ekadashi 2022 MSRTC 4700 Special ST Buses Pandharpur Yatra  SAAM TV
मुंबई/पुणे

Ashadi Ekadashi 2022 : पंढरपूरसाठी ४७०० एसटी बस सोडणार, तुमच्या शहरातून किती आणि कधी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष बस सोडण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी ही घोषणा केली.

६ जुलै ते १४ जुलै २०२२ या कालावधीत या विशेष बस धावणार आहेत. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी ८ जुलै रोजी २०० बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परब यांनी केले. (Pandharpur Yatra)

गेली दोन वर्षे कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi 2022) पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बस उपलब्ध करून दिल्या होत्या.

दोन वर्षांनंतर यंदा वारी सोहळा होणार आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे भाविक आणि प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे, तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे गावी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. म्हणून पंढरपूर यात्रेसाठी सुमारे ४ हजार ७०० बस सोडण्यात येणार असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले.

विशेष गाड्यांचे नियोजन

औरंगाबाद - १२००

मुंबई - ५००

नागपूर - १००

पुणे - १२००

नाशिक - १०००

अमरावती- ७००

चार तात्पुरती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या सोयीकरिता यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.

दरम्यान, यात्रेच्या काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, शौचालये, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोई सुविधा पुरवण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बसस्थानकांचे नियोजन

पंढरपूर येथे यात्रेसाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांसाठी पुढीलप्रमाणे बस स्थानके व जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

१. चंद्रभागा बसस्थानक- मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार

२. भिमा यात्रा देगाव - औरंगाबाद, नागपूर व अमरावती प्रदेश

३. विठ्ठल कारखाना - नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

४. पांडुरंग बसस्थानक - सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे : खराडीमध्ये हाॅटेलला भीषण आग, अग्निशामक पथकाचे धाडस; 6 गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने टळला माेठा धाेका

Atishi Marlena: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण भाजपचं षडयंत्र; आप नेत्या आतिशींचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: अवैध होर्डिंगवर कारवाईचे आदेश; सरकारकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

PM Kisan Yojana: निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच खात्यात जमा होणार २००० रुपये

Tendli Sabzi Benefits : 'ही' १० रुपयांची भाजी अनेक आजारांवर गुणकारी; डायबिटीजपासून किडनीपर्यंत सर्व आजार छुमंतर

SCROLL FOR NEXT