Pune News: आषाढी एकादशीनिमित्त सरकारचं कैद्यांना मोठं गिफ्ट! भजन स्पर्धेत सहभागी झालेल्यांना शिक्षेत विशेष माफी Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: आषाढी एकादशीनिमित्त सरकारचं कैद्यांना मोठं गिफ्ट! भजन स्पर्धेत सहभागी झालेल्यांना शिक्षेत विशेष माफी

Special amnesty in punishment for prisoners: महाराष्ट्रातील सर्व कारागृहात कैद्यांकरिता राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या..

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune News: आज राज्यभरात आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. एकादशीनिमित्त सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत असतानाच राज्यातील कैद्यांसाठीही राज्य सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे.

महाराष्ट्रातील कारागृहात पार पडलेल्या अभंग व भजन स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व कैद्यांना प्रशासनाकडून विशेष माफीची तरतूद देण्यात आली आहे. ज्यानुसार महाअंतिम फेरीत निवड झालेल्या कारागृहातील कैद्यांना शिक्षेत ९० दिवसांची माफीची सवलत देण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या एक महिन्यांपासून राज्यात आषाढी वारीचा (Ashadhi Wari 2023) सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. याच निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व कारागृहात कैद्यांकरिता राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माधथ्यमातून ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भाग घेतलेल्या कैद्यांसाठी राज्यसरकारने मोठं बक्षिस दिले असून 90 दिवस ते 30 दिवसापर्यंत विशेष माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्य कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

यानुसार महाअंतिम फेरीत निवड झालेल्या कारागृहातील कैद्यांना शिक्षेत ९० दिवसांची माफी मिळणार आहे. तसेच अभंग आणि भजनात उत्तम प्रदर्शन करणाऱ्या कैद्यांना ६० दिवस तर काही कैद्यांना ३० दिवस शिक्षेत माफी मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, या स्पर्धेची महाअंतिम फेरी 13 जून राेजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात पार पडली होती. यामध्ये सर्व सहभागी संघांनी भक्तीपूर्ण वातावरणात व तल्लीनतेने भजन व अभंगाचे सादरीकरण केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT