Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Surabhi Jayashree Jagdish

मेष

काहीतरी गूढत्वाच्या मागे आज आपले मन धावेल. मग गुप्तधन ते असेल,अचानक मिळणाऱ्या पैशाच्या मागे मन धावेल.

वृषभ

कामाच्या ठिकाणी काहीतरी वेगळेपण असण्याचा आज योग आहे. नवीन घडामोडी घडतील. जवळच्या व्यक्तींच्या कडून योग्य दिशा मिळेल.

मिथुन

न ठरवता काही गोष्टी करण्याच्या मागे लागू नका. कामांमध्ये अडथळे अधिक प्रमाणात येतील. आपल्याच लोकांच्या कडून अडचणी उदभवतील.

कर्क

प्रेमासाठी व्यापक दृष्टिकोन मिळेल. नव्या ओळखी परिचय यामध्ये रंगत वाढेल. शेअर्समधील व्यवसाय फायदेशीर ठरेल. दिवस चांगला आहे.

सिंह

गृहसौख्याला दिवस उत्तम आहे. नवीन वाहन खरेदी, घराशी निगडित व्यवहार होणार असतील तर दिवस उत्तम असे फलित देईल.

कन्या

लहान प्रवासामधून फायदा होईल.भावंडांचे सहकार्य उत्तम राहील. दिवस चांगला आहे.

तुळ

धनयोग चांगले आहेत. जुन्या अडकलेल्या पैशाशी निगडित व्यवहार आज सुकर होतील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक

मनासारख्या गोष्टी घडतील.स्वतःसाठी विशेष वेळ काढून नवीन संकल्प घ्याल. जुन्या गोष्टी पूर्णही होतील.आनंददायी दिवस आहे.

धनु

खर्च वाढतील. मनासारख्या गोष्टी होण्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल. मनोबल कमी राहील.

मकर

अनेक लाभ घेऊन आलेला आजचा दिवस आहे. नव्याने ओळखी होतील. परिचयामधून फायदा होईल. मित्र-मैत्रिणींच्या घराण्यात धावपळीत दिवस कसा जाईल कळणार नाही.

कुंभ

कामामध्ये चांगली वाढ होईल आपले क्षेत्र रुंदावेल. सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगतीचे योग आहेत. राजकारणात सुद्धा आघाडी मिळेल.

मीन

भाग्याला कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. सद्गुरूंची उपासना फायदेशीर ठरेल. मोठे प्रवास घडतील. काही सुवार्ता कानी येतील.

Satara Tourism: गारेगार वातावरणात पिकनीकला जाताय? साताऱ्यातील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

येथे क्लिक करा