Gatari Amavasya 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: आली रे आली गटारी आली! भरपावसात पुणेकरांच्या चिकन-मटण दुकानाबाहेर रांगा, पाहा VIDEO

People Crowd In Mutton Shop In Pune: आज गटारी अमावस्या आहे. त्यामुळे पुणेकरांची चिकन-मटण दुकानांबाहेर गर्दी दिसत आहे.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

आषाढ महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज ‘गटारी’च्या नावाने ओळखली जाणारी आषाढी अमावस्या साजरी केली जाते. आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण महिना सुरू होतो. त्यामुळे अनेकजण गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे आज गटारी अमावस्येच्या दिवशी मासांहारवर मात्र मनसोक्त ताव (Ashadh Amavasya 2024) मारतात. त्यामुळेच पुण्यात देखील 'गटारी' साजरी करण्याचं जोरदार नियोजन दिसत आहे. त्यासाठी पुणेकरांनी सकाळपासूनच मटणाच्या दुकांनाबाहेर रांगा लावल्याचं दिसत आहे.

गटारी आली...

महत्वाचं म्हणजे, रविवारचा योग साधून आलाय. त्यामुळे अनेकांनी आज जोरदार ‘गटारी’ साजरी करण्याचं नियोजन केलंय. त्याच निमित्ताने पुण्यात देखील चिकन, मटण दुकानाच्या बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळत (Ashadhi Amavasya) आहेत. गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेकजण मटण खात नाहीत. त्यामुळेच आज पुणेकरांनी मटण खरेदीसाठी दुकानांबाहेर मोठी गर्दी केलीय.

पुण्यात गटारी

चिकन मटनच्या दरात काहीशी वाढ झालेली दिसताना दिसत आहे. परंतु नागरिकांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाहीये. पहाटपासून नागरिकांची मटण खरेदीसाठी मोठी गर्दी झालीय. सकाळी सहा वाजल्यापासूनच मटण आणि चिकनच्या (Mutton Shop) दुकानाबाहेर पुण्यातील नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. पुण्यातील नवी पेठेतील एका मांसाराच्या दुकानाच्या बाहेरून सामटीव्हीने आढावा घेतलाय.

मटणाच्या दुकांनाबाहेर रांगा

पुण्यातील अनेक परिसरांतील आज दुकानांबाहेर हेच दृष्य बघायला मिळत आहे. मटणप्रेमींसाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. गटारीचा उत्साह पुण्यात मोठ्या प्रमाणात दिसत (Pune News) आहे. मटण विक्रेत्यांची आज मात्र भरपूर कमाई होणार आहे. चिकनप्रेमी मात्र गटारीसाठी अत्यंत उत्साही आहेत. त्यामुळे डोक्यावर पाऊस कोसळत असताना देखील त्यांनी दुकानाबाहेर गर्दी केलीय.

मुंबईत देखील गटारीचा उत्साह

आज गटारी अनेकजण साजरी करणार आहेत. यासाठी लालबागच्या चिकन आणि मटन दुकानांच्या बाहेर मोठी गर्दी बघायला मिळत आहे. अनेकजण रांगा लावून मटन विकत घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेले देखील दिसून येत आहेत. चिकन मटण चां फक्कड बेत आज अनेकांच्या घरी असणार आहे. बॉयलर - १७० रुपये किलो, देशी - ३०० रुपये किलो, नेट चिकन - २६० रुपये किलो, इंग्लिश - १५० रुपये किलो, कलेजी - २४० रुपये किलो, मटण - ७४० रुपये किलो असा मटनाचा भाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT