भारतीय लष्कराचे इंटेलिजन्स डिपार्टमेंट पिंपरी-चिंचवड पोलिसांवर नाराज SaamTv
मुंबई/पुणे

भारतीय लष्कराचे इंटेलिजन्स डिपार्टमेंट पिंपरी-चिंचवड पोलिसांवर नाराज

लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या पिंपरी चिंचवड येथील दौऱ्यादरम्यान पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आलेल्या हलगर्जीपणाबद्दल लष्कराच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटने अतिशय तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या पिंपरी चिंचवड येथील दौऱ्यादरम्यान पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आलेल्या हलगर्जीपणाबद्दल लष्कराच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटने अतिशय तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. 6 ऑगस्ट 2021 ला भारतीय लष्कर प्रमुख हे पिंपरी-चिंचवड येथील टाटा मोटर्स आणि तळेगाव येथिल एल एन्ड टी कंपन्यांच्या प्लांट मध्ये पाहणीसाठी आले होते.

हे देखील पहा -

लष्कर प्रमुखांचे हेलिकॉप्टर टाटा मोटर्स मधिल हेलिपॅड वर उतरविण्यात आले होते. लष्कर प्रमुख पिंपरी येथील टाटा मोटर्स कंपनीच्या हेलिपॅड वर उतरत असल्याने त्याठिकाणी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अतिशय कडक असा पोलिस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता. मात्र लष्कर प्रमुखांसाठी अतिशय कडक पोलिस बंदोबस्त असताना सुध्दा बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी मोबाईलवर चॅटींग करणे, फोन कॉलिंग करणे, आप आपसात गप्पा मारणे, फोटो काढणे अस हलगर्जीपणाचे वर्तन केल्याचे लष्कराच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या निदर्शनास आले आहे.

लष्कर प्रमुख हे जेव्हा एखाद्या ठिकाणी दौऱ्यावर असतात तेव्हा त्या ठिकाणी लष्कर प्रमुखांच्या सुरक्षेसाठी काही सुरक्षा निर्देश पाळण्यात येतात. मात्र, या सुरक्षा निर्देशाची पायमल्ली पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे. लष्कराच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटने पिंपरी-चिंचवड पोलिसांवर अतिशय तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक आदेश काढला आहे.

यापुढे बंदोबस्तावर असलेल्या ठराविक पोलिस अधिकाऱ्यांनाच बंदोबसत्तादरम्यान मोबाईल फोन वापरण्याची परवानगी देण्यात येणार आहे. परवानगी नसलेल्या कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तादरम्यान मोबाईल फोन वापरल्यास बंदोबस्त अधिकाऱ्यांविरोधात शिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल असे आदेश पिंपरी चिंचवड पॉलिस आयुक्तांनी काढले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election : बिहारमध्ये भाजप सत्तेत येणार, शरद पवारांच्या आमदाराने सांगितले गणित

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण

महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भयंकर घडलं; माजी क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

Swara Bhaskar: 'सर मला फिल्ममध्ये...'; सलमान खानच्या 'या' चित्रपटात स्वरा भास्करला व्हायचं होत हिरोईन, पण निर्मात्याने...

iPhone Tips: आयफोन स्मार्टपणे वापरयचा आहे का? मग 'या' ५ गुप्त सेटिंग्ज जाणून घ्या

SCROLL FOR NEXT