Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : ऑर्डर वेळेवर न आल्याच्या रागातून बारबाहेर वाद, वेटर्सकडून ग्राहकाला मारहाण; दहिसर येथील घटना

Dahisar News : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आठ ते दहा वेटर्स एका ग्राहकाला लाठीकाठ्याने मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे.

Shivani Tichkule

संजय गडदे

Mumbai News : मुंबई उपनगराच्या दहिसर परिसरातील एका बार आणि रेस्टॉरंट मधील आठ ते दहा वेटर्स कडून एका ग्राहकाला बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुंबईच्या दहिसर पूर्वेकडील आशिष बार आणि रेस्टॉरंटच्या वेटर्स कडून ही मारहाण झाली असल्याचे समजते. (Latest Marathi News)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आठ ते दहा वेटर्स ग्राहकाला लाठीकाठ्याने मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेसात वाजल्याच्या दरम्यान घडली असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच दहीसर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार हे तात्काळ सदर ठिकाणी पोहोचून सात वेटर्स आणि तीन ग्राहकांना ताब्यात घेतले व त्यांना अटक केली आहे.

आशिष बार आणि रेस्टॉरंट हे दहिसर पोलीस (Dahisar Police) ठाण्याच्या हद्दीत येत आहे. शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास वेटर्स आणि ग्राहकांमध्ये तुफान हाणामारी झाली. ऑर्डर वेळेवर न आल्याच्या कारणावरून ही मारहाण झाली असल्याचे सांगण्यात आले.

ग्राहकांनी वेटर्सला ऑर्डर सबंधित विचारले असता वेटर्सने थोडा उशीर लागेल असे सांगतात बचावाशीला सोडवायचे व याचे रूपांतर हाणामारी झाले. या हाणामारीचा व्हिडिओ (Video Viral) सोशल माध्यमातून वाऱ्यासारखा पसरला. तात्काळ घटनास्थळावर पोलिसांनी दाखल होऊन दोन्ही गटांतील व्यक्तींना ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

त्यानंतर दोन्ही गटांतील व्यक्तींच्या तक्रारींवरून गुन्हे नोंद करण्यात आले असुन त्यात सहभाग असणाऱ्या 7 वेटर्स आणि तीन ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी देखील अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेट्रो बार आणि मीटिंग बार मधील वेटर्स कडून ग्राहकाला लाट्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली होती. तसेच खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील वेटर्स कडून ग्राहकांना लोखंडे रोडने मारहाण करण्याचा देखील प्रकार घडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT