Ulhasnagar Crime
Ulhasnagar Crime Saam Tv
मुंबई/पुणे

गुन्हा मागे घेण्याचा वाद; उल्हासनगरात दोन तरुणांवर भररस्त्यात चाकू हल्ला!

अजय दुधाने

अजय दुधाने

उल्हासनगर: भररस्त्यात दोन तरुणांवर चाकू हल्ला झाल्याची घटना उल्हासनगर शहरात घडलीय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यातील तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उल्हासनगर कॅम्प-3 मधील कमला नेहरू नगर येथे राहणारा श्रीकांत सिंग आणि पियुष राय हे तरुण रविवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास कॅम्प नंबर-1 येथील झुलेलाल मंदिर चौकात आईस्क्रीम खाण्यासाठी गेले. त्यावेळी तिथे बबलु जे. डी., नितीन अहिरे, सुरज बेहनवाल हे तिथे आले. तेव्हा बबलु जे. डी. हा श्रीकांत सिंग याला म्हणाला, मनीषला बोल जुनी केस मागे घ्यायला बोल, त्यावरून श्रीकांत त्याला म्हणले की, त्याचा तो बघेल मी त्याला का सांगु.

या सर्व प्रकारचा राग मनात धरून त्या तिघांनी श्रीकांतला दगड व विटांनी मारण्यास सुरवात केली. तेव्हा त्यापैकी सुरज बेहनवाल याने धारधार चाकूने श्रीकांतवर गंभीर वार केले. यावेळी श्रीकांतला वाचविण्यासाठी पियुश राय मध्यस्थी गेला तर पियुश राय याच्या मनगटाला वार करण्यात आले.

हे देखील पाहा-

जखमी श्रीकांत आणि पियुष यांच्यावर कळवा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात बबलु जे. डी., नितीन अहिरे, सुरज बेहनवाल यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत या करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा; सराफा व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितल्याचा आरोप

Health Tips: सकाळी प्या हिंगाचे पाणी, वजन राहील नियंत्रणात

Maharashatra Election: ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड?

West Bengal News: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; कर्नाटकचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी

Jayant Patil: ... तर पंचाईत होईल, जयंत पाटील यांचा विश्वजित कदम यांना इशारा; नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT