नवी दिल्ली: मायक्रोसॉफ्टने 27 वर्षांच्या सेवेनंतर आपला सर्वात जुना ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer) बंद करण्याची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की ते जुन्या ब्राउझरसाठी मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करणार आहे. हे पहिल्यांदा 1995 मध्ये Windows 95 साठी ऍड-ऑन पॅकेज म्हणून प्रसिद्ध झाले होते. तेव्हा मायक्रोसॉफ्ट पॅकेजसह ब्राउझर विनामूल्य प्रदान केले गेले होते. आता कंपनीच्या अधिसूचनेनुसार, इंटरनेट एक्सप्लोरर 15 जून 2022 पासून काम करणे बंद करणार आहे. (latest tech news in Marathi)
याबद्दल बोलताना कंपनीने सांगितले की, विंडोज 10 वरील इंटरनेट एक्सप्लोरर सेवा आता मायक्रोसॉफ्ट एजमध्ये उपलब्ध असणार आहे. Microsoft Edge हा इंटरनेट एक्सप्लोररपेक्षा वेगवान, अधिक सुरक्षित आणि अधिक आधुनिक ब्राउझर आहे. Microsoft Edge मध्ये इंटरनेट एक्सप्लोरर मोड प्रदान केला आहे, जो तुम्हाला इंटरनेट एक्सप्लोरर-आधारित वेबसाइट्स आणि ऍप्लिकेशन्स थेट Microsoft Edge वरून ऍक्सेस करता येईल.
इंटरनेट एक्सप्लोरर ऐवजी मायक्रोसॉफ्ट एज;
हे येत्या 15 तारखेपासून बंद होणार आहे म्हणून, जे अजूनही इंटरनेट एक्सप्लोरर वापरत आहेत त्यांनी 15 जून 2022 पूर्वी मायक्रोसॉफ्ट एज वापरण्याची विनंती कंपनीने केली आहे. कंपनीने सांगितले की, तुम्ही आता इंटरनेट एक्सप्लोररऐवजी मायक्रोसॉफ्ट एजवर शिफ्ट व्हा.
Microsoft Edge तुमच्या डिव्हाइसवर आधीपासूनच आहे. विंडोज 10 सर्च बॉक्स वापरून मायक्रोसॉफ्ट एज करा. जर कदाचित ते तुमच्याकडे नाही तर ते तुम्ही ते सहजपणे डाउनलोड करू शकता. कंपनीने म्हटले आहे की, एकदा तुम्ही मायक्रोसॉफ्ट एजवर जाण्याचा पर्याय निवडला की, तुम्ही तुमचे पासवर्ड, फेव्हरेट्स आणि इतर ब्राउझिंग इंटरनेट एक्सप्लोररवरून काही क्लिकमध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता.
एकेकाळी इंटरनेट एक्सप्लोरर हे अत्यंत लोकप्रिय ब्राऊझर होते. 2000 सालानंतर हे ब्राऊझर वापरनाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली. 2003 मध्ये या वेब ब्राउझर मार्केट शेअर जवळपास 95 टक्क्यांपर्यंत वाढला होता. तसेच जगभरातील जवळपास प्रत्येक व्यक्ती हा इंटरनेट एक्सप्लोरर रोज वापरत होता. त्यानंतर पुढे गुगल क्रोम, फायरफॉक्स असे काही ब्राउझर बाजारात आणले गेले. परंतु बदलत्या काळानुसार उपडेट होणे गरजेचे असते, याचप्रकारे इतर ब्राउजर्सच्या तुलनेत इंटरनेट एक्सप्लोरर स्वतःला अपडेट करू शकला नाही. परिणामी तो बाजारात मागे पडू लागला. अश्यापकारे हळूहळू लोकांनी इंटरनेट एक्सप्लोरर वापरणं बंद केलं. मायक्रोसॉफ्टने देखील 2016 मध्ये इंटरनेट एक्सप्लोरर ब्राउझर अपडेट करणे बंद केले. त्यानंतर, मायक्रोसॉफ्टने इंटरनेट एक्सप्लोरर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयाचा लोकांवर फारसा परिणाम होताना दिसून येणार नाही. कारण सध्या बहुतेक लोक आधीपासूनच इतर वेब ब्राउझर वापरत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.