ते स्वतःच्या मतदारसंघात बद्दल बोलतायत का? हे मला माहित नाही - खा. श्रीकांत शिंदे Saam Tv News
मुंबई/पुणे

ते स्वतःच्या मतदारसंघाबद्दल बोलतायत का? हे मला माहित नाही - खा. श्रीकांत शिंदे

ठाणे जिल्ह्यातील कुठल्याच रस्त्याचे काम वेळत पूर्ण केले जात नाही. असे विधान केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमधील पत्रकार परिषदेत केले होते.

प्रदीप भणगे

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील कुठल्याच रस्त्याचे काम वेळत पूर्ण केले जात नाही. हा ठाणे जिल्ह्याला शाप आहे. जे ठेकेदार असतात, ते बोगस ठेकेदार असतात. त्यामुळे मुदतीत काम होत नाही, असे खळबळजनक विधान केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमध्ये घेतल्या पत्रकार परिषदेत केले होते. आता याला कल्याण शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे. (Are they talking about their own constituency? I don't know - MP. Shrikant Shinde)

हे देखील पहा -

शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे डोंबिवलीमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनाच्या मध्यवर्ती शाखेत आले होते आणि त्यांनी नागरिकाच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे, दीपेश म्हात्रे, महेश गायकवाड, मनोज चौधरी, विश्वनाथ राणे उपस्थित होते. तसेच यावेळी पत्रकारांना विविध विषयावर चर्चा केली आणि केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विधानाला उत्तर दिले आहे.

खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले की ते स्वतःच्या मतदारसंघात बद्दल बोलता आहेत का? हे मला माहिती नाही, पण माझ्या मतदार संघामध्ये आपण जर पाहिलं कल्याण शीळ रोड असेल मोठ्या गतीने काम सुरू आहे. विविध रस्ते असतील त्यांची कामे चालु आहेत आणि कामे केली सुद्धा आहेत. कल्याण डोंबिवलीला रस्त्यांसाठी आत्ताच 360 कोटी मिळाले आहेत. अंबरनाथ मध्ये कामं सुरू आहेत, उल्हासनगरला कामं सुरू आहेत. लोकप्रतिनिधींचं काम असतं जर धीम्या कामं चालू असतील तर ते जलद गतीनं करुन घ्यायचे आणि पाठपुरावा करायचा हे लोकप्रतिनिधी याचं कामच असतं. ते कुठल्या रस्त्याबद्दल बोलताय ते मला माहिती नाही.

केंद्रीयमंत्री कपिल पाटील काय म्हणाले होते?

ठाणे जिल्ह्यातील कुठलेच रस्त्याचे काम वेळत पूर्ण केले जात नाही. हा ठाणे जिल्ह्याला शाप आहे. जे ठेकेदार असतात, ते बोगस ठेकेदार असतात. त्यामुळे मुदतीत काम होत नाही असे खळबळजनक विधान केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपील पाटील यांनी कल्याण मध्ये घेतल्या पत्रकार परिषदेत केले होते. यात्रेपश्चात केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांना विचारणा करण्यात आली की आपण ज्या कल्याण शीळ रस्त्यावरुन यात्र केली. त्या रस्त्या काय अवस्था आहे. त्यावर केंद्रीय मंत्री पाटील यांनी सांगितले की, कल्याण शीळ रस्त्याचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरु आहे. त्या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याविषयी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मागणीनुसार या रस्ते कामाची चौकशी करण्यात येईल असे पाटील यांनी सांगितले होते. शहापूर कजर्त हायवे या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे त्यांनी सांगितले होते.

वर्षाअखेर मध्य रेल्वेची पाचवी आणि सहावी लाईन सुरू होणार - खा. डॉ. शिंदे

दिवा-ठाणे दरम्यान मध्यरेल्वेची पाचव्या आणि सहाव्या लाईनचे काम सुरु आहे. याबाबत खासदार शिंदे यांनी सांगितले की या वर्षाअखेर पाचवी आणि सहावी लाईन सुरू होईल आणि नविन वाहतूक सुरू होईल. पाचव्या आणि सहाव्या लाईनमुळे अतिरिक्त 50 फेऱ्या वाढणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT