पुण्यात नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात: कंटेनरच्या केबिनचा अक्षरशः चुराडा Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात: कंटेनरच्या केबिनचा अक्षरशः चुराडा

मुंबई- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे याठिकाणी नवले पुल परिसरामध्ये अपघातांची मालिका ही कायम सुरूच आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : मुंबई- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे याठिकाणी नवले पुल परिसरामध्ये अपघातांची मालिका ही कायम सुरूच आहे. एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे महामार्गावरच दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला आहे. यामध्ये चालक जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याविषयी मिळालेली माहिती अशी की, साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेला हा कंटेनर नवले पुल परिसरात आल्यानंतर कंटेनर चालकाचे वाहनावर असलेले नियंत्रण सुटले आणि महामार्गावरच रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, चालकाच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

हे देखील पहा-

यामध्ये चालक जखमी झाला असून त्याला जवळच्या मोरया हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने पोहचले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी चालकाला बाहेर काढले आहे.

क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन काढण्याचे काम सुरू असून महामार्गावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागले आहेत. सकाळी ९ वाजेच्या दरम्यान कामांवर जाणाऱ्यांची लगबग सुरू असते. यावेळी नवले पुल परिसरात महामार्गावर रोज गर्दी असते. मात्र, आज महामार्गावर अपघात घडला त्यावेळी आजूबाजूला कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अपघातग्रस्त कंटेनर ची अवस्था पाहिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT