Dummy Candidate in Police Bharti Saam Tv
मुंबई/पुणे

Police Bharti: पोलीस भरतीत डमी उमेदवार पाठवल्याचा आणखी एक प्रकार समोर, दोघांवर गुन्हा

कागदपत्रांच्या पडताळणीत ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

सुरज सावंत

मुंबई: पोलीस भरतीत सहभागी होण्यासाठी बोगस उमेदवार पाठवल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मुंबई पोलीस भरतीमध्ये डमी उमेदवार पाठवल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. भोईवाडा पोलीस ठाण्यात औरंगाबाद आणि पुणे येथील दोन तरुणांवर नोंदवला गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Another case of sending dummy candidate in police recruitment exam happen in Mumbai).

सोपन शेलार आणि ज्ञानेश्वर गोवळकोंडा अशी या तरुणांची नावे आहेत. सोपन याने लेखी परिक्षेसाठी (Exam) कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र, दुसऱ्या दिवशी ओळखपत्रावर ज्ञानेश्वर याचा फोटो लावून लेखी परीक्षेसाठी शेलार याने ज्ञानेश्वरला पाठवले. सोपन याला कांदिवली स्टेशनजवळ बजाज बीएमसी स्कूल हे सेंटर मिळाले होते.

मात्र, कागदपत्रांच्या पडताळणीत ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी सोपान शेलार याला अटक केली आहे. तर ज्ञानेश्वर गोवळकोंडा याचा शोध पोलीस घेत आहेत.

यापूर्वीही अशा प्रकारचे 8 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 'साम टीव्ही'ने ही बातमी सर्व प्रथम दाखवल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या; तिवसा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Rahul Gandhi: 'राहुल गांधी चर्चेपासून पळू नका...', सत्ताधारी आक्रमक, संसद परिसरात काढला मोर्चा

बाजारात जाण्याची गरज नाही! घरच्या घरी कुंडीमध्ये उगवतील अशा ५ भाज्या; आजच सुरू करा किचन गार्डनिंग!

PM SVANidhi Yojana : फेरीवाल्यांसाठी खुशखबर! मिळणार ₹30,000 पर्यंत क्रेडिट कार्ड; 50 दिवस व्याज नाही

फ्लॅट मालकांसाठी मोठी बातमी! भाडेकरूने नियम मोडला तर दंड कोणाला भरावा लागणार? सोसायटीचा नियम ऐकून उडेल झोप

SCROLL FOR NEXT