BJP leader K Annamalai’s controversial remarks trigger a political storm involving Raj and Uddhav Thackeray ahead of the Mumbai civic polls. saam tv
मुंबई/पुणे

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

Annamalai vs Thackerays: मुंबई महापालिका निवडणुकीला चांगलाच रंग चढलाय... ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर आता भाजप नेते अन्नामलाईंनीही ठाकरेंना आव्हान दिलंय... नेमकं अन्नामलाईनं काय म्हटलंय? आणि मलाईंच्या वक्तव्यावरुन मुंबईचं राजकारण कसं तापलंय.

Omkar Sonawane

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय.. त्यातच तामिळनाडू भाजपचे नेते अन्नामलाईनं मुंबई महाराष्ट्राची नसल्याचं वक्तव्य करुन थेट मराठी माणसाच्या अस्मितेलाच धक्का लावलाय.... एन निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यानं असं वक्तव्य केल्यानतर ठाकरेंच्या मुंबईतल्या संयुक्त सभेत त्याचा उल्लेख अपेक्षितच होता, साहजिकच ठाकरे बंधूनी आपल्या सभेतून अन्नामलाईच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय...

एवढंच नाही तर मुंबई महाराष्ट्राची नाही हे वक्तव्य करणाऱ्या अन्नामलाईनं आता पुन्हा मी मुंबईला येतोय, माझे पाय छाटून दाखवा, असं म्हणत मराठी अस्मितेला आव्हान दिलंय..

काय म्हणाले अन्नामलाई?

मला धमकावणारे आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे दोघे कोण?

मी शेतकऱ्याचा मुलगा असून अशा धमक्यांना घाबरत नाही

मी मुंबईत नक्की येणारेय, हिंमत असेल तर पाय कापून दाखवा

जर मी अशा धमक्यांना घाबरलो असतो, तर आज राजकारणात नसतो

केवळ मला शिव्या देण्यासाठी सभेचं आयोजन

दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी अन्नामलाईबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप आमदार तमिळ सेल्वन आणि डी राजा यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय...

खरं तर मुंबईतल्या 4 लाख दक्षिण भारतीय मतदारांसाठी अन्नामलाई आले आणि बरळले.मुंबईत येऊन त्यांनी मुंबईकरांची कुरापत काढली..आधी कृपाशंकर सिंह आणि आता अन्नामलाई.. यांची अशी मुक्ताफळं म्हणजे मराठी माणसाच्या मनावरचा घाव आहे. मराठी माणूस अशा नेत्यांना 15 तारखेला कोणती जागा दाखवतो हे पाहणं महत्वाचं ठरेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक प्रशासनाची घरावर धाड; शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

Tuesday Horoscope : तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावा लागेल

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल, VIDEO

ऐन निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का; लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले, कारण काय?

SCROLL FOR NEXT