anil parab
anil parab  saam tv
मुंबई/पुणे

Anil Parab: वाद पेटला! 'म्हाडा' च्या अधिकाऱ्यांना अनिल परबांनी घेतले फैलावर, सौमय्यांवरही हल्लाबोल, म्हणाले; 'नाक घासायला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Anil Parab On Kirit Somaiya: ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचं काल वांद्रे येथील म्हाडा वसाहतीमधील कार्यालय पाडण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हाडाकडून अनिल परब यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

पण या घटनेनंतर अनिल परब आज स्वत: म्हाडाच्या कार्यालयात गेले. म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत अनिल परबांची बराच वेळ बैठक झाली. अनिल परब तब्बल चार तासांनी म्हाडाच्या कार्यालयाबाहेर आले. त्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या आणि म्हाडा अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. (Anil Parab)

"गेले दीड वर्ष किरीट सोमय्या माझ्यावर जे आरोप करत होते आणि सांगत होते की, हे अनिल परब यांचं अनधिकृत कार्यालय आहे. मी त्याबाबतीत वारंवार सांगत होतो की, ही जागा माझी नाही. ही जागा सोसायटीची आहे. सोसायटीचं ते कार्यालय आहे. ते कार्यालय वापरण्याची परवानगी मला सोसायटीने दिलेली आहे”, असं अनिल परब यांनी स्पष्ट केले.

म्हाडा कार्यालयामध्ये २७ जून २०१९ रोजी अनिल परब यांच्या नावे जाहीर केलेली नोटीस आम्ही मागे घेतलेली आहे. या दोन गोष्टींचा अर्थ असा होतो, किरीट सोमय्या केवळ जाणूनबुजून मला बदनाम करण्यासाठी माझ्यावर आरोप करत आहेत. ते आरोप म्हाडाने खोटे ठरवले आहेत. म्हाडाने मला लेखी लिहून दिलं आहे. याचा अर्थ असा आहे की, किरीट सोमय्या खोटे बोलत आहेत. किरीट सोमय्या आज तोंडावर पडले आहेत”, अशी टीका अनिल परब यांनी केली.(Kirit Somaiya)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Loksabha Election: "तुमच्या तात्याला साथ द्या" वसंत मोरेंची पुणेकरांना आर्थिक मदतची साद

Special Report : आमदार म्हणताहेत, "खासदार झाल्यासारखं वाटतंय', राज्यात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Special Report : ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा गड राखणं शिंदेंना जड? Politics

Special Report : ठाकरे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर? केजरीवालांचं नाव घेत भाजप नेत्याचा इशारा

Special Report : Devendra Fadnavis यांचा Dhairyasheel Mohite Patil यांना इशारा

SCROLL FOR NEXT