Anil Parab: सोमय्यांना थेट चॅलेंज, राणेंनाही खेचलं वादात; अनिल परबांनी सगळंच सांगून टाकलं...

हे बांधकाम पाहण्यासाठी किरीट सोमय्या जाणार होते. मात्र शिवसैनिकांनी त्या ठिकाणी गर्दी केल्याने पोलिसांनी त्यांना बिकेसीजवळ अडवले आहे
Anil Parab Kirit Somaiya Contraversy
Anil Parab Kirit Somaiya ContraversySaam Tv
Published On

रुपाली बडवे..

Mumbai: माजी मंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. वांद्रे पूर्व भागातील परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.

Anil Parab Kirit Somaiya Contraversy
Refinery Project : हे जाळून टाकू, तिकडे ताेडफाेड करु.. भाषा थांबवा अन् चर्चेला या : उदय सामंत

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील कार्यालय तोडल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. हे पाडकाम पाहण्यासाठीही ते या ठिकाणीही जाणार होते. त्याआधी अनिल परब यांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, "कालपासून बातम्या येत आहेत की अनिल परब यांच कार्यालय तोडलं, माझा जन्म झाला, माझं बालपण गेलं, या इमारती म्हाडाच्या मालकीच्या नाहीत, हे बांधकाम अनधिकृत नव्हत, किरीट सोमय्यांनी बिल्डरची सुपारी घेतली आहे."

पुढे बोलताना अनिल परब यांनी, "हे पाडलेले बांधकाम पाहायला येणारे किरीट सोमय्या कोण आहेत, ते म्हाडाचे अधिकारी आहेत का असे म्हणत त्यांना इथे यायचं असेल तर पोलिसांनी त्यांना अडवू नये. त्यांनी इथे यावं, आम्ही स्वागत करायला तयार आहोत. त्यांनी शिवसैनिकांचा पाहुणचार अनुभवावा," असे आव्हान सोमय्यांना दिले आहे.

Anil Parab Kirit Somaiya Contraversy
Chandrashekhar Bawankule : सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर स्वागतच; बावनकुळेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

"ही गरिबांची घरं आहेत. म्हाडाच्या 56 वसाहती आहेत. 220 स्क्वेअर फुटांची जागा आहे तेवढीच जागा द्यायची. बिल्डरांची सुपारी सोमय्यांनी घेतली आहे, असे म्हणत नारायण राणे यांच्या घरात बेकायदा बांधकाम आहे, मी त्या ठिकाणी पाहणीला जाणार आहे, किरीट सोमय्या हे माझ्यासोबत येणार आहेत का?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, हे बांधकाम पाहण्यासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) जाणार होते. मात्र शिवसैनिकांनी त्या ठिकाणी गर्दी केल्याने पोलिसांनी त्यांना बिकेसीजवळ अडवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com