Refinery Project : हे जाळून टाकू, तिकडे ताेडफाेड करु.. भाषा थांबवा अन् चर्चेला या : उदय सामंत

उदय सामंत हे माध्यमांशी बाेलत हाेते.
Ratnagiri, uday samant, barsu refinery project
Ratnagiri, uday samant, barsu refinery projectsaam tv

Ratnagiri News : कुठच्या हि परिस्थितीत रिफायनरी (reifnery project) बाबत आम्ही सकारात्मक पावलं टाकतोय. शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही यंत्रणा उभी केली आहे. दादागिरी आणि दडपशाही करून काेणी रिफायनरीला विरोध करू नये. शेतकऱ्यांचं आम्ही ऐकायला तयार आहोत असे उद्याेग मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)

Ratnagiri, uday samant, barsu refinery project
Kokan News : कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, महिन्यापुर्वी घनदाट जंगलात घडली खूनाची घटना

उदय सामंत म्हणाले जे काेणी टीका करताहेत त्यांच्याबद्दल काही बाेलायची गरज नाही. ते देखील डावाेसला जाऊन आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात परदेशी गुंतवणुकदार माेठ्या प्रमाणात येऊ शकतात हे दाखवून दिले आहे.

Ratnagiri, uday samant, barsu refinery project
Kokan Teachers Constituency Election : पनवेलला गाेंधळ; कर्मचारी सांगत हाेता कसे करायचे मतदान, कार्यकर्त्यांनी दाखविला इंगा

सर्वताेपरी (ratnagiri) पॅकेज देण्यासाठी आमची तयारी आहे. स्कूल, आराेग्य यंत्रणा, काैशल्य विकासच्या माध्यमातून विकास या सर्व गाेष्टी आम्ही करण्याच्या तयारीत आहाेत. दरम्यान हे जाळून टाकू तिकडे ताेडफाेड करु ही भाषा न करता सरकार बराेबर चर्चा करावी असे आवाहन सामंत यांनी केले आहे.

दरम्यान रिफायनरी विरोधकांना तडीपारी संदर्भातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राजापूर प्रांत कार्यालयात नुकतीच सुनावणी हाेती. आता ही सुनावणी ७ फेब्रुवारीपर्यत पुढे ढकलण्यात आली आहे. रिफायनरी विरोधक संघटनेतील ६ जणांना तडीपारीची नोटिस बजावण्यात आली होती. यात रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, सत्यजित चव्हाण, सतीश बाणे, दिपक जोशी, नितिन जठार आणि नरेंद्र जोशी यांना नाेटीसा बजावल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com