Anil Deshmukh Saam TV
मुंबई/पुणे

१०० कोटी वसूली प्रकरणात अनिल देशमुख मुख्य आरोपी; ED चे प्रतिज्ञापत्र सादर

देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहेत.

सुरज सावंत

मुंबई: ईडीने (ED) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनिल देशमुख हेच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं म्हटलं आहे. वसुलीतून जमा केलेले पैसे देशमुख यांनी बोगस कंपन्यांद्वारे वळवल्याचे तपासात समोर आले आहे. तर भ्रष्टाचाराच्या पैशांचा स्रोत याबाबत देशमुखांनी असमाधानकारक उत्तरं दिली आहेत. या प्रकरणाचे ईडीचे तपास अधिकारी तासिन सुलतान यांच्या पथकाने ५६ पानांचे हे प्रतिज्ञापत्रक मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे.

या पत्रात देशमुखांचा अधिकाऱ्याच्या बदली प्रकरणातही थेट संबध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहेत. यामुळे देशमुखांची सुटका झाल्यास ते राजकिय वजन वापरून पुराव्यांशी छेडछाड करू शकतात असाही अंदाज ईडीने वर्तवला आहे. तसेच देशमुख हे तपासाही सहकार्य करत नसल्याने त्यांना जामीन देऊ नये असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT