मुंबई: आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपा प्रकरणी तुरुंगामध्ये असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने (court) फेटाळला आहे. यामुळे त्यांची रवानगी परत एकदा तुरुंगातच होणार आहे. सोमवारी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर PMLA न्यायालयामध्ये सुनावणी झाली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुख यांना २ नोव्हेबर २०२१ या दिवशी अटक (Arrested) करण्यात आली होती. जवळपास ४ महिन्यापासून अनिल देशमुख तुरुंगामध्ये आहेत. मुंबई (Mumbai) सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टामध्ये सोमवारी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली आहे. (Anil Deshmukh bail rejected in money laundering case)
पहा व्हिडिओ-
अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. प्रथमदर्शी सादर करण्यात आलेले पुराव्यावरुन आरोपी (Accused) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सामील असल्याचे सिद्ध होत आहे, असे निरीक्षण विशेष न्यायाधीश आरएस रोकडे यांनी नोंदवले आहे. तसेच साक्षीदारांच्या विधानांमध्ये विरोधाभास असताना देखील या टप्प्यावर जामीनाचा विचार केला जाऊ शकत नाही, असे रोकडे यांनी यावेळी सांगितले आहे. मुंबई माजी पोलिस आयुक्त (Police Commissioner) परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप (Allegations) करण्यात आले होते.
यानंतर त्यांच्या घरावर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने ५ वेळा समन्स बजावले होते. मात्र, यानंतर अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. यानंतर त्यांच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. तसेच त्यांना शोधण्यासाठी सीबीआयची मदत मागण्यात आली आहे. यादरम्यान, १ नोव्हेंबर दिवशी ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यावेळी त्यांची तब्बल १२ तास चौकशी करण्यात आली आहे. यानंतर ईडीने त्यांच्याविरोधामध्ये अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्यामध्ये एकच खळबळ माजली होती.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईमधील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया स्फोटकं प्रकरण समोर आल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आले आहेत. ही स्फोटकं ठेवण्यामागे आणि ज्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवली होती. त्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येमागे पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा हात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून १०० कोटींची वसुली केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.