Breaking: दोन महिने नाॅट रीचेबल असलेले अनिल देखमुख ED कार्यालयात हजर! Saam TV
मुंबई/पुणे

Breaking: दोन महिने नाॅट रीचेबल असलेले अनिल देखमुख ED कार्यालयात हजर!

अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अनेक दिवसांपासून नॉट रीचेबल असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख ED कार्यालयात दाखल झाले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप आहेत. अनेक समन्स देऊनही देशमुख ED कार्यालयात हजार राहत नव्हते. अखेर अनिल देशमुख ED कार्यालयात हजर राहिले आहेत. 100 कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते NCP Leader अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत 5 वेळा समन्स दिला असताना देखील ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. कायद्यानुसार अन्य पर्यायांचा विचार करत असल्याच कारणं देत त्यांनी चौकशीला हजर राहण्यास नकार दिला होता.

दरम्यान ईडी कडून पाठविन्यात आलेल्या समन्स पैकी एका समन्सचा स्वतः अनिल देशमुखांनी स्वीकार केला तर बाकीच्या समन्स त्यांचा वकील Lawyer आणि कुटुंबियांनी स्वीकार केला होता. समन्सचा स्वीकार करून देखील अनिल देशमुख हे ईडी समोर हजर झाले नाही म्हणून आईपीसी IPC कलम 174 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे. दरम्यान देशमुख चौकशी संदर्भात सहकार्य आणि उपस्थित राहत नसल्याने त्यांच्या विरोधात आता चीफ मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट कोर्टाने समन्स देखील जारी केला होता.

मध्यंतरीच्या काळात अनिल देशमुख यांचा पत्ता जाणून घेण्यासाठी सीबीआयने एक नवीन शक्कल लढवली होती. देशमुख यांच्या नागपुरातल्या घरी सीबीआयचे पथक दाखल झाले होते. एकूण ५ ते ६ अधिकारी देशमुख यांच्या घरी दाखल झाले होते. सकाळी आठच्या सुमारास सीबीआयचे पथक देशमुख यांच्या नागपूर येथील निवास्थानी दाखल होते. त्यांच्याकडे अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचे वॉरंट असल्याची माहिती समोर आली होती. अनिल देशमुख यांना वारंवार नोटीस पाठवून देखील ते चौकशीसाठी समोर आले नाहीत. लुट आऊट नोटीस जारी करुन देखील देशमुख चौकशीला हजर राहिले नव्हते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT