Pune college viral video साम टीव्ही मराठी
मुंबई/पुणे

लेकीसाठी बाप वाघ झाला! छेडणाऱ्याला कॉलेजमध्ये तुडवले, पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्रकार

Pune college viral video : पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात मुलीला ऑनलाईन छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला तिच्या वडिलांनी कॅम्पसमध्येच पकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कॉलेज परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

Akshay Badve

Pune college harassment case, father beats student campus : लेकीसाठी बापाचं काळीज नेहमीच हळवं असतं. पण त्याच लेकीला जर कुणी त्रास दिला तर तोच बाप काळ बनून समोर उभा राहतो. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मागील १५ दिवसांपासून एक टवाळखोर मुलीचा (student harassment incident) ऑनलाईन छळ करत होता. याबाबत बापाला समजलं, त्यानं थेट कॉलेज गाठलं अन् मुलाला चोप दिला. (viral college campus video )

त्या हुल्लडबाजाला मुलीच्या बापाने चक्क कॉलेजच्या कॅम्पसमध्येच सर्वांसमोर तुडवले अन् थेट वॉर्निंग दिली. मुलीला त्रास दिला तर याद राख... असा इशाराही बापाने दिला. नामांकित कॉलेजच्या कॅम्पसमध्ये झालेल्या या राड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कॉलेज कॅम्पस आणि पुण्यात या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. पाहा व्हायरल व्हिडिओ...

पुण्यातील नामांकित महाविद्यालयाच्या आवारात बापाला संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. १५ दिवसांपासून मुलीला ऑनलाईन छळ करणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्यांनी कॅम्पसमध्येच गाठले आणि जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाल्याचा प्रकार समोर आला. बापाने पोराला चांगलाच तुडवला. कॅम्पसमध्ये काही जण हा प्रकार पाहत होते, पण बापाच्या संतापाचा सामना करण्याची कुणाची हिम्मत झाली नाही. मुलीला त्रास दिला तर याद राख, असा सज्जड दम त्या मुलाला दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी गेल्या १५ दिवसांपासून पीडित तरुणीला ऑनलाईन माध्यमातून त्रास देत होता. वारंवार होणाऱ्या या छळामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. हे ऐकताच हळवा बाप वाघ झाला. तो विद्यार्थी पुन्हा कॅम्पसमध्ये आला असता, वडिलांनी त्याला रंगेहाथ पकडले. यावेळी संतापलेल्या बापाने विद्यार्थ्याला खडेबोल सुनावले, ज्याचे रूपांतर वादात झाले. बापाने त्या टवाळखोर मुलाला चोपला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT