Extortion case Saam Tv
मुंबई/पुणे

अंगडिया खंडणी प्रकरण: सौरभ त्रिपाठी यांच्या पाठोपाठ वडीलही फरार घोषित

या प्रकरणात हवाला द्वारे पैसे पाठवल्याचा संशयही पोलिसांना आहे.

सुरज सावंत

मुंबई - अंगडिया वसूली प्रकरणात निलंबित अधिकारी सौरभ त्रिपाठी (Sourabh Tripathi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सौरभ त्रिपाठी यांचे वडील निलकांत त्रिपाठी यांनाही पोलिसांनी फरार म्हणून घोषित केलं आहे. त्याच बरोबर मलबार हिल येथील दोन प्राॅपर्टी डिसप्युट वादातही सौरभ त्रिपाठी यांनी हस्तक्षेप केल्याचे तपसात समोर आले आहे. त्रिपाठी यांनी पाठवलेल्या ५ लाखांची रोख रक्कम ही आशितोष मिश्राला दिली.

त्यातील काही रक्कम ही मिश्राने सौरभ त्रिपाठी यांचे वडिल निलकांत यांना दिली असल्याची कबूली मिश्राने पोलीस तपासात दिली. सौरभ त्रिपाठी यांच्या विरोधात आता अन्य काही जण तक्रार देण्यास पुढे आले आहेत. या प्रकरणात हवाला द्वारे पैसे पाठवल्याचा संशयही पोलिसांना आहे. सध्या आशितोष मिश्राच्या पोलीस (Police) कस्टडीत ११ एप्रिल पर्यंत न्यायालयाने वाढ केली आहे.

हे देखील पहा -

काय आहेत आरोप?

गेल्या वर्षी 7 डिसेंबर रोजी अंगडिया असोसिएशनने मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी अंगडियांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी दरमहा 10 लाख रुपयाची लाच देण्याची मागणी केली होती असे आरोप करण्यात आले होते.

कोण आहेत सौरभ त्रिपाठी?

डीसीपी सौरभ त्रिपाठी हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्रिपाठी यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे. तिथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्यांनी बंदोबस्तासाठी चांगलं काम केलेले होतं. त्यानंतर मुंबईत परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली.

त्रिपाठी यांनी प्रोटेक्शन सिक्युरिटी विभागात डीसीपी म्हणून काम पाहिलं आहे. त्यांची नियुक्ती परिमंडळ 2 मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती जिथे त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले. आरोपानंतर त्यांची बदली डीसीपी ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आली पण त्यांनी अद्याप चार्ज घेतला नाही. दरम्यान त्रिपाठी यांना पहिले आरोपी म्हणून घोषित करण्यात आलंय आणि गृहविभागाला निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

SCROLL FOR NEXT