Maharashtra Political Crisis News| Uddhav Thackeray Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Andheri East Bypoll Election : उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गट भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याविरोधात आक्षेप घेण्याच्या तयारीत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Andheri East Bypoll Election : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Uddhav Thackeray) भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गट भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याविरोधात आक्षेप घेण्याच्या तयारीत आहे. मुरजी पटेल यांच्यावर असलेल्या गुन्ह्यामुळे हा आक्षेप घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांच्याकडून मुरजी पटेल यांच्यावर आक्षेप घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संदीप नाईक हे आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेऊन मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर घेतलेल्या चार ते पाच विषयांवरील आक्षेपासंदर्भात माहिती देणार असल्याचं समजतंय.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या मुरजी पटेल हे २०१७ मध्ये अंधेरी महापालिकेत निवडून आले होते. त्यावेळी सुद्धा संदीप नाईक यांनी मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल यांच्याविरोधात जात प्रमाणपत्रावरून आक्षेप घेतला होता.

या आक्षेपानंतर पाटीदार समाजातील पटेल यांनी ओबीसी म्हणून सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले होते. याविरोधात पटेल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.

त्यामुळे एप्रिल २०१९ मध्ये मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीचं नगरसेवकपद गेले होते दरम्यान, आता दुपारी २ वाजेच्या पत्रकारपरिषदेत संदीप नाईक हे मुरजी पटेल यांच्याविरोधात काय गौप्यस्फोट करतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update : नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला निरोप देताना झालेल्या तोडफोड प्रकरणी शंभराहून अधिक जणांवर गुन्हा दाखल

Sleepy After Lunch : दुपारच्या जेवणानंतर झोप येतेय? मग हे पदार्थ खाणं आत्ताच टाळा

Malegaon : मालेगावात पुन्हा शिक्षक भरती घोटाळा; २ कोटी ६९ लाखात फसवणूक केल्याचे उघड, पाच जणांवर गुन्हा दाखल

Khodala Waterfall: मुंबईपासून जवळ असलेल्या धबधब्यावर भिजायचा प्लान करताय? 'हा' स्पॉट ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT