Andheri By Election
Andheri By Election  saa, tv
मुंबई/पुणे

अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला; सोशल मीडियावर अचानक 'या' चिन्हाचा प्रचार वाढला

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Andheri By Election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आज सहा वाजता थांबला. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने चांगलीच कंबर कसली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दिवंगत रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांची पत्नी रिंगणात आहे. लटके यांच्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात झाडून हजेरी लावली. आज पोटनिवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर मात्र, सोशल मीडियावर प्रचाराला सुरूवात झाली आहे. मात्र, सोशल मीडियावर अचानक 'नोटा'चा प्रचार वाढला आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आज सहा वाजता थांबला असला तरी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या फेसबुक आणि व्हाट्सअपवर प्रचार आणि धुराळा उडवायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करणाऱ्यांकडून 'नोटा'ला मतदान करा आणि ताकद दाखवून द्या, असा संदेश देत मेसेज व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या ऋतुजा रमेश लटके विरुद्ध नोटा असा सामना रंगतो की काय? अशी चर्चा आता अंधेरी पूर्व भागात रंगू लागली आहे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा रमेश लटके या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी जरी आपली उमेदवारी मागे घेतली असली तरी सुद्धा अंधेरी (Andheri) पूर्वेत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर 'नोटा'चा प्रचार केला जात आहे. मुरजी पटेल जरी मैदानात नसतील तरी आपण आपली ताकद दाखवून देण्यासाठी 'नोटा'ला मतदान करावे, असं आवाहन करणारे ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यामुळे साऱ्यांचे लक्ष अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीकडे लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP VS Thackeray Group: मुलुंडमध्ये ठाकरे गट-भाजप कार्यकर्ते भिडले; BJP वॉर रूमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप

MI vs LSG, IPL 2024: राहुल- पुरनची तुफान फटकेबाजी! मुंबईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: बाळासाहेबांनी पडत्या काळात मदत केली, ते उपकार तुम्ही विसरला; शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

Maharashtra Politics 2024 : प्रमोद महाजन असते तर मोदी पंतप्रधान असते का? इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

Benifits of Curry leaves: सकाळी उठल्यावर कढीपत्याचे पाणी प्या; आरोग्याला होतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT