Anant- Radhika Wedding Saam Tv
मुंबई/पुणे

Anant- Radhika Wedding: लग्नबंधनात अडकले अनंत अंबानी-राधिका मर्चंट, वरमाला सोहळ्याचा VIDEO समोर

Anant Ambani Radhika Merchant Wedding Updates: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न १२ जुलै रोजी झालंय. मुंबईत पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून पाहुणे आले होते.

Rohini Gudaghe

मुंबई: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनचा जल्लोषमहिनाभरापूर्वी जामनगरमध्ये पाहायला मिळाला होता. आता १२ जुलै रोजी अनंत आणि राधिका मर्चंट एकमेकांसोबत लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. अनंत आणि राधिका यांच्या वरमाला सोहळ्याचा व्हिडिओ समोर आलाय. अनंत-राधिकाच्या लग्नाचे विधी १४ जुलैपर्यंत चालणार आहे. वरमाला समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी राधिका यांना पुष्पहार घालताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये दिसतंय की, अनंत अंबानी आणि राधिका या दोघांनाही खुर्चीसह वर उचलण्यात आलं. यानंतर राधिकाची खुर्ची खाली करून अनंत अंबानी यांनी त्यांच्या गळ्यात माळ घातली. अनंत अंबानींची वधू राधिका मर्चंटचा फर्स्ट लूक समोर आलाय. राधिकाने लग्नात लाल आणि पांढरा रंगाचा घागरा परिधान केलेला होता.

लग्नसोहळ्यात देश-विदेशातील पाहुणे

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात हॉलिवूड सेलिब्रिटींनी देखीलही सहभाग घेतला होता. किम कार्दशियन आणि तिची बहीण ख्लो किम कार्दशियन यांनीही विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. किम आणि तिची बहिण देसी लूकमध्ये दिसली. किम लाल रंगाच्या साडीत दिसली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात शाहरुख खानने पत्नी गौरी खानसोबत हजेरी लावली होती. यावेळी शाहरुख खानेने नीता अंबानींसोबत डान्स केल्याचं समोर आलंय.

बॉलिवूड सितारे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात व्यस्त दिसले. लग्नाच्या वरातीत अभिनेता अनिल कपूरने माय नेम इज लखन या गाण्यावर डान्स केलाय. यादरम्यान वरुण धवन आणि रणवीर सिंग देखील डान्स करताना दिसले. संजय दत्तने अनंत अंबानींसोबत ढोलाच्या तालावर डान्स केला.

निक जोनासने शेअर केला व्हिडिओ

अनंत अंबानींच्या लग्नात सहभागी होण्यासाठी प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास देखील पोहोचले होते. निक जोनासने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये प्रियांका कारमध्ये बसून गाण्याच्या तालावर डोलताना दिसतेय.

माधुरी दीक्षितची कुटुंबासह हजेरी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आले होते. यामध्ये माधुरी दीक्षित पती आणि मुलासोबत पोहोचली होती. अनंत अंबानींच्या लग्नात सगळे पाहुणे अगदी आनंदाने नाचताना दिसले. इशा अंबानीने पहाडियासोबत डान्स केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT