आनंदनगर एमआयडीसीत घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक अजय दुधाणे
मुंबई/पुणे

आनंदनगर एमआयडीसीत घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक

या टोळीने गेल्या अनेक दिवसांपासून घातला होता धुमाकूळ

अजय दुधाणे

मुंबई - अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी MIdC परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी Theft अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अखेर कंपनीच साहित्य चोरणाऱ्या टोळीला अंबरनाथ शिवाजी नगर Shivaji Nagar पोलिसांनी Police गजाआड केले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून अंबरनाथ आनंद नगर Anandnagar एमआयडीसीतील कंपनी मधील साहित्य चोरीला जात होते यामुळे या परिसरातील उद्योजक अक्षरशा त्रस्त झाले होते.

हे देखील पहा -

या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी उद्योजकांनी पोलीस यंत्रणेकडे केली होती. अखेर आकाश वळवे, मनोज जंगल्या, संदीप वाघे , काशिनाथ वाघे, सुनील वळवे या पाच जणांच्या टोळीला अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी मधील रेस टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील वॉचमनला मारहाण करून त्याला खुर्चीला बांधून सुमारे दीड लाख रूपयांचे कॉपरचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले होते.

या चोरट्यांच्या हालचाली कंपनीच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या. याआधी देखील या चोरट्यांनी याच भागातील एका कंपनीतील काही साहित्य चोरले होते. अश्या प्रकारे अजूनही काही कंपन्यांमध्ये या चोरट्यांनी चोरी केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT