Maharashtra Cabinet Meeting Decisions  Saamtv
मुंबई/पुणे

Cabinet Decisions : दिवाळीआधी सर्वसामान्यांना शिंदे सरकारकडून 'गिफ्ट'; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

Cabinet Meeting News : विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

दिवाळीत सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा १०० रुपयात आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. तर विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

  • दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश.

  • विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ.

  • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.

  • नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी.

  • इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा (Political News)

आनंदाचा शिधामध्ये दोन पदार्थ वाढवले- मुख्यमंत्री

मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. यामध्ये मैदा आणि पोहे हे दोन पदार्थ वाढवले आहे. अल्पसंख्याक २७ विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबिनवर जो रोग आला आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

नांदेड घटनेतील दोषींवर कारवाई केली जाईल

मंत्रिमंडळ बैठकीत नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील घटनेचाही आढावा घेण्यात आला. घटनेनंतर संबंधित मंत्री आणि अधिकारी घटनास्थळी गेले आहेत. १२७ प्रकारची औषधं होती, औषधांचा तुटवडा नव्हता. स्टाफ देखील पुरेसा आहे. घटनेची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Car Boat: मुंबईच्या समुद्रात चक्क धावतेय Rolls Royce, व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा

Nagpur: लग्नावरून परतताना काळाचा घाला, भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

Zodiac signs: आजचा दिवस शुभ की आव्हानात्मक? या ४ राशींना मिळणार अनपेक्षित लाभ

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेणार! रेपो रेटमध्ये कपात करणार? होम लोनवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT