

रेल्वेत नोकरीची संधी
असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरती
११००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती
रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेत तब्बल ११००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती होणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने या भरतीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. रेल्वेच्या या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.
रेल्वेल एएलपी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरती होणार आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या रिक्त जागा आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे.
रेल्वेतील एएलपी पदासाठी सर्वाधिक पदे ही ईस्ट कोस्टमध्ये भरली जाणार आहेत. येथे १६२५ पदे भरली जाणार आहे. यानंतर साउथ ईस्टर्न रेल्वेत १५३१ पदे भरली जाणार आहे. सेंट्रल रेल्वेत १४०० पदे भरली जाणार आहेत. असे एकूण ११,१२७ पदे भरती केली जाणार आहेत.याबाबत नवीन अधिसूचना लवकरच जाहीर केली जाईल.
पात्रता
रेल्वेतील असिस्टंट लोको पायलट पदासाठी उमेदवाराने १०वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल असावे. याचसोबत मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिटर, इलेक्ट्रिशियन, इनस्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमॅन, ट्रॅक्टर मॅकेनिक अशा विविध ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असावे. याचसोबत अप्रेंटिसशिप केलेली असावी. या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
पगार
सहायक लोको पायलट पदासाठी उमेदवारांना पे लेव्हल २ नुसार १९,९०० रुपये पगार मिळेल. याचसोबत इतर भत्ते आणि सुविधादेखील दिल्या जातील. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड सीबीटी-१, सीबीटी २ आणि कागदपत्र पडताळणी, मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.