eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरणं NCP नेत्याला पडलं महागात; पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता

NCP नेत्यावर अटकेची टांगती तलवार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यामुळं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरला होता. त्यामुळे आनंद परांजपे यांच्या विरोधात चार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता आनंद परांजपे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी एक ट्विट केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ठाणे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर दाखल झालेल्या NC आता FIR मध्ये रूपांतरीत करण्यात आल्या आहेत. व त्या Cognisable Offence मध्ये घेतल्या आहेत. आज रात्री त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार अशी खात्रीलायक बातमी मला पोलिसांनीच दिली आहे. आपल्या राज्याची वाटचाल आता पोलीसी राज्याकडे होऊ लागली कि काय? तर अटक कराच, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते आनंद परांजपे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्याला तुम्ही चाणक्य समजत आहात, तोच तुमचा टायटॅनिक करायला कारणीभूत ठरणार आहे. तर ही आमची वैचारिक लढाई आहे. आमच्यावर ज्यांनी गुन्हे दाखल केले आहेत तेच खरे गुन्हेगार आहेत. आंदोलन करताना आम्ही काही घोषणा दिल्या. त्या असंसदीय नव्हत्या. आम्ही कोणाचीही बदनामी केली नाही, असंही आनंद परांजपे यांनी म्हंटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: मुंख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, कॅबिनेट मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pune : पुण्यातील भयंकर घटना! सिलिंडर बदलताना अचानक ब्लास्ट, एकाचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?

Shivrajyabhishek 2026: राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर जाताय? मुंबई-पुण्याहून कसे पोहोचाल, किती येईल खर्च? जाणून घ्या एका क्लिकवर

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर-आदित्य तारेची तुफानी सुरुवात, फाल्कन्सने रॉयल्सवर थरारक विजय मिळवत उघडलं खातं

SCROLL FOR NEXT