'छत्रपती हे हिंदूच, त्यांचे राज्य हे हिंदवीच आणि हिंदूंचेच हिंदूंसाठीचं'  Saam TV
मुंबई/पुणे

'छत्रपती हे हिंदूच, त्यांचे राज्य हे हिंदवीच आणि हिंदूंचेच हिंदूंसाठीचं'

याच मुद्द्याला पकडून दवेंनी काही प्रश्न उपस्थीत केले.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) म्हणाले, महाराजांचे नाव बदनाम करू नका आणि हिंदूंनी त्यांना सेक्यूलर ठरवून काय उपयोग, इतर धर्मीय तसं समजतात का ? किती मुस्लिम शिवजयंतीला येतात, किती मशीदित महाराजांचे फोटो आहेत?. छत्रपती हे हिंदू राजाच, त्यांचे राज्य हे हिंदवीच आणि हिंदूंचेच हिंदूंसाठीचं असे मत आनंद दवे यांनी व्यक्त केले आहे.

याच मुद्द्याला पकडून दवेंनी काही प्रश्न उपस्थीत केले.

1) प्रत्येक किल्ल्यावर मंदिर बांधणाऱ्या पूर्ण कारकिर्दीत राजांनी एकही मशीद बांधली नाही.

2) कोणत्याही मशीदीला नवीन इनाम दिला नाही.

3) आमचं इनाम महाराजांनी बंद केल्याचे पुरंदरच्या काझीचं लेखी पत्र आज पण उपलब्ध आहे.

4) गोव्यातील मशीद पाडून पुन्हा तेथे सप्तकोटिश्वरचे मंदिर बांधले, तसेच अगदी तिकडे तामिळनाडूत सुद्धा केलं

5) कल्याण, डोंबिवली येथील चर्चचे गोडाउनमध्ये रूपांतर केल्याचे फ्रायरच्या अंकात नमूद.

6) शिवाजी महाराजांनी मुस्लिम धर्माची वाट लावली आदिल शाहच कन्होजी जेधे यांना पत्र.

7) आत्ता हे हिंदू राष्ट्र झालं आहे. हाडकोरण या गावात शिलालेख

8) नेताजी पालकर, बाबाजी निंबाळकर यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं.

9) स्वराज्य स्थापने नंतर 1658 पासून एक सुद्धा मुस्लिम सैनिक नव्हता.

वरील मुद्दे उपस्थीत केल्यानंतर आनंद दवे पुढे म्हणाले महाराजांना सेक्यूलर समजणाऱ्या प्रत्येक फेक्युलर चे सर्व मुद्दे सहज खोडून काढता येतील अशी कागदपत्रे आज सुद्धा उपलब्ध आहेत. हिंदूच नाही तर देशातील कोणत्याही धर्माचा, कोणताही नागरिक आज सुद्धा महाराजांना हिंदू राजाच मानतो, आणि हाच माझ्या राजाच्या परिणाम आहे... तो तसाच राहील असा विश्वासही आनंद दवे यांनी व्यक्त केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोठं आंदोलन, 70 लाख आंदोलक रस्त्यावर , नेमकं कारण काय?

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

Manoj Jarange Effect : जालना पोलिस पाटील भरतीत ‘जरांगे इफेक्ट’! मराठा समाजाच्या उमेदवारांचा डंका

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Nashik Tourism : नाशिकला गेलाय? मग 'हा' ऐतिहासिक किल्ला नक्की पाहा

SCROLL FOR NEXT