Amruta Fadnavis Slams to Uddhav Thackeray About Making Fun Of Devendra Fadnavis weight
Amruta Fadnavis Slams to Uddhav Thackeray About Making Fun Of Devendra Fadnavis weight Saam TV
मुंबई/पुणे

फडणवीसांच्या वजनाची खिल्ली; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ मे ला मुंबईतील सभेत देवेंद्र फडणवीसांच्या वजनाबाबत खिल्ली उडवली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते की, फडणवीस बाबरी मशिद (Babri Masjid) पाडायला नव्हते. ते तेव्हा तिथे असते आणि त्यांनी बाबरीवर चढायचा प्रयत्न जरी केला असता तर त्यांच्या वजनानेच बाबरी पडली असती असं म्हणत त्यांनी फडणवीसांची (Devendra Fadnavis) खिल्ली उडवली होती. याला आता देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. "वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया .." असं ट्विट करत अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. (Amruta Fadnavis Slams to Uddhav Thackeray About Making Fun Of Devendra Fadnavis weight)

हे देखील पाहा -

"वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया" असं ट्विट (Tweet) करत अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका केली आहे. "वजनदार माणसाने, हलक्या माणसाला अलगद वजनाने हलकं केलं" अशा आशयाचं ट्विट अमृता फडणवीसांनी केलं आहे. त्यामुळे अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध सुरु होऊ शकतं. याधीही अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अनेकदा शाब्दिक खटके उडाले आहेत. (Mocking the weight of Fadnavis; Amruta Fadnavis Slams to CM Uddhav Thackeray)

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

१४ मे ला बीकेसीत झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली होती. ते म्हणाले होते की, बाबरी पाडताना ते (फडणवीस) म्हणतायत शिवसैनिक नव्हते. फडणवीस म्हणतात मी गेलो होतो तिकडे, तेव्हा तुमचं वय काय होतं, काय शाळेच्या सहलीला गेला होतात. चला चला चला अयोध्येला चला. असं काय होतं का?" असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली होती. "तुमचं वय काय, बोलता काय, तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलंय. देवेंद्र तुम्ही गेला असतात ना तर तुमच्या वजनाने पडली असती. मग लोकांना श्रमच करावे लागले नसते." असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

बाबरी पाडायला शिवसैनिक नव्हतेच - फडणवीसांचा पुनरुच्चार

उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर १५ मे ला झालेल्या उत्तरसभेत फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं, फडणवीस म्हणाले की, आज माझं वजन १०२ किलो आहे, बाबरी पाडायला गेलो होतो त्यावेळी माझं वजन १२८ किलो होतं, लाजायचं काय त्यात? मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसाची भाषा कळत नाही, त्यांना एफएसआयच्या भाषेत उत्तर द्यावं लागतं. सामान्य माणसाचा एफएसआय १ असेल तर आज माझा २ आहे आणि बाबरी पाडताना तो २.५ होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. तसेच बाबरी पडली तेव्हा त्याठिकाणी शिवसैनिक नसल्याचा पुनरुच्चार फडणवीसांनी केला. कोठारी बंधूंनी बाबरीवर तेव्हा भगवा फडकवला होता. बाबरीच्या संघर्षात तेव्हा मी अनेक दिवस तुरूंगात होतो. बदायूच्या तुरुंगात अनेक दिवस मी काढले. आम्ही अयोध्येत गेलो. शेवटपर्यंत शिवसैनिकांची वाट पाहत राहिलो. पण हे शेवटपर्यंत आले नाहीत. बाबरी आम्हीच पाडली, असंही फडणवीस पुन्हा म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या आणखी एका उमेदवाराने भरला अर्ज; दरेकरांचं काय?

Today's Marathi News Live : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

Nashik-Mumbai Highway : नाशिक मुंबई महामार्गावर दुचाकीला धडक दिल्यानंतर बलगरने घेतला पेट; केबीनमध्ये अडकून चालकाचा होरपळून मृत्यू

Camphor Benefits: देवाला प्रसन्न करण्यासह आरोग्यासाठी कापूर आहे फायदेशीर

Sonakshi Sinha : अंधारात दिवा जसा, तसं तुझं सौंदर्य...

SCROLL FOR NEXT