Bandatatya Karadkar : बंडातात्यांना RSS आणि भाजपचं पाठबळ नाही - अमृता फडणवीस
Bandatatya Karadkar : बंडातात्यांना RSS आणि भाजपचं पाठबळ नाही - अमृता फडणवीस Saam TV
मुंबई/पुणे

Bandatatya Karadkar : बंडातात्यांना RSS आणि भाजपचं पाठबळ नाही - अमृता फडणवीस

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Supriya Sule and Pankaja Munde) दारू पितात तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सज्जन आहेत पण उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांना अयोग्य निर्णय घ्यायला लावतात तसंच ढवळ्याशेजारी पवळा बांधल्याने गुण लागतोच अशी टीका जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी केली होती त्यांच्या या टीकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून बंडातात्यांवरती कारवाईची मागणी केली आहे.

तसंच या टीका होत असताना बंडातात्यांचा आणि RSS चा संबंध असल्याची टीका होत असतानाच आता या प्रकरणी माजी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस (Denvendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील बंडाडात्यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या,' स्त्रियांच्या खाजगी आयुष्यावर टिप्पणी करणे हे योग्य नाही, कोणी काही वक्तव्य करतात. त्यावर मग आंदोलन केली जातात. मात्र आपण स्वतः विचार करायला हवा की आपण काय बोलायला हवं काय बोलायला नको. तसंच वक्तव्य केल्यानंतर ऍक्शन घेतली जातात मात्र मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. कोणावरही वैयक्तिक टिपणी व्हायला नको असही त्या म्हणाल्या.

तसंच भाजपा आणि आरएसएस हे स्त्रीचा मान ठेवणारे आहेत त्यामुळे विरोधक बंडातात्या यांना RSS पाठबळ आहे हे म्हणणं चुकीच असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

SCROLL FOR NEXT