Navneet Rana Rally Rada Saam tv
मुंबई/पुणे

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

Navneet Rana attacked in amravati : माजी खासदार नवनीत राणा थोडक्यात बचावल्या आहेत. नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये खिल्लार गावात नवनीत राणांची प्रचार सभा होती. तेव्हा या सभेत मोठा राडा झाला.नेमकं काय घडलं अमरावतीत पाहुया.

Tanmay Tillu

मुंबई : राणा आणि ठाकरेंमध्ये पुन्हा वाद पेटलाय. अमरावतीच्या दर्यापूरमधील नवनीत राणांच्या सभेत झालेला राडा....भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्या. सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत राणांच्या दिशेने येणाऱ्या खुर्च्या रोखल्या. नवनीत राणा यांची सभा उधळण्याचाही प्रयत्न झाला. या घटनेनंतर भाजप आक्रमक झाली असून खल्लार ठाण्यात नवनीत राणा यांच्या नेतृत्वात ठिय्या करण्यात आला. नेमका काय प्रकार घडला पाहुया.

नवनीत राणांना यापूर्वीही अनेक धमक्या मिळाल्यात. 10 ऑक्टोबरला नवनीत राणा यांना धमकीचं पत्र आलं होतं. यामध्ये 10 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, सभेतील हल्ल्यानंतर राणांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केलीये.

दरम्यान, या घटनेला आता राजकीय वळणं लागलंय..नवनीत राणा यांनी हल्ला प्रकरणावरुन अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर आरोप केलाय. ज्या प्रचारसभेत राडा झाला ते गाव उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षाचं गावं होतं, असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय.

गेल्या काही महिन्यात अमरावतीत सातत्यानं धार्मिक ध्रुवीकरणाच्या जोरावर राजकारण रंगताना पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीपूर्वीही अमरावतीत दोन गटात राडा झाला. आता पुन्हा राणांवरील हल्ल्यानं अमरावतीसह खल्लार गावाला छावणीचं स्वरुप आलंय.अशा तणावपूर्ण परिस्थितीत मतदार कोणाच्या पारड्यात कौल देणार आणि अमरावती शांत कोण ठेवणार हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT