Navneet Rana Rally Rada : दर्यापूरमध्ये राडा, नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या, सभेत मोठा गोंधळ

Navneet Rana Rally Rada : नवनीत राणा यांच्या सभेवेळी जोरदार गोंधळ पाहायाला मिलाला. काही कार्यकर्त्यांनी राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकून मारल्या.
Navneet Rana Rally Rada
Navneet Rana Rally RadaNavneet Rana Rally Rada
Published On

Navneet Rana Rally Rada : माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेदरम्यान जोरदार गोंधळ झाला आहे. दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील (daryapur assembly constituency) खल्लार गावात नवनीत राणा यांच्या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा झालाय. काही लोकांनी माजी खासदार नवनीत राना यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचं समोर झालेय. नवनीत राणा रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या, त्यावेळी जमावाने घोषणाबाजी करत गोंधळ घातला. खुर्च्या फेकल्या. दोन गटामध्ये हाणामारी, धक्काबुक्की आणि राडा झाल्याचे माहिती समोर मिळाली.

शनिवारी रात्री नवनीत राणा दर्यापूर मतदारसंघात प्रचारासाठी आल्या होत्या. खल्लार या गावात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी नवनीन राणा यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोठा गोंधळ झाला. यावेळी दोन गटाचे कार्यकर्ते भिडले. जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना पाचरण करण्यात आले. पोलिसांनी हे प्रकरण शांत केले. पण यामध्ये अनेकजण जखमी झाल्याचे समजतेय. खुर्च्या फेकून मारल्या. तोडफोड करण्यात आली. दोन गटात जोरदार घोषणाबाजी आणि मारमारी झाल्याचं समोर आलेय. खल्लार गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

दोन गटात राडा झाला. नवनीत राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाल्याचे समोर आलेय. या प्रकारानंतर नवनीत राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिसांत धाव घेतली. या घटनेचा व्हिडीओ पोलिसांना दाखवत नवनीत राणा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

दर्यापूरमध्ये नेमकं काय झालं?

अमरावतीमधील दर्यापूर मतदारसंघातील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोठा गोंधळ झाला. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात काही जणांनी नवनीत राणा यांच्यावर खुर्च्या फेकल्याने गोंधळ उडाला. या घटनेत नवनीत राणा थोडक्यात बचावल्याचं समजतेय. राड्यानंतर नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस ठाणे गाठले.

या घटनेने रॅलीतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याशिवाय दर्यापूर येथील राजकीय वातावरणात तणाव वाढला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com